Latur Car Accident: चालकाचा ताबा सुटला, भरधाव स्कॉर्पिओ गाडी थेट हॉटेलमध्ये घुसली; अन् पुढे....; लातूरच्या मुरुड येथील घटना
Latur Car Accident: लातूर जिल्ह्यातील मुरुड शहरानजीक एक भीषण अपघात झाला आहे. यात भरधाव स्कॉर्पिओ गाडी चक्क हॉटेलमध्ये घुसल्याची घटना घडली आहे.

Latur Car Accident: लातूर जिल्ह्यातील मुरुड शहरानजीक एक भीषण अपघात झाला आहे. यात भरधाव स्कॉर्पिओ गाडी चक्क हॉटेलमध्ये घुसल्याची घटना घडली आहे. ही अपघाताची घटना आज (16 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास घडलीय. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात (Car Accident News) झाल्याची प्रथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, तीन ते चार जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिलीय.
दरम्यान, या अपघातातील जखमींना मुरुड शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अशातच अपघाताची माहिती समजताच मुरुड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी (Accident) धाव घेतली. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कार चालकाचीही चौकशी केली जात आहे.
डिझेलचा टँकर उलटल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा
दरम्यान अशीच एक अपघाताची घटना अहिल्यानगर- पुणे महामार्गावरील चास गावाजवळ घडली आहे. यात डिझेलचा टँकर उलटल्याची घटना घडली आहे. चास जवळील धोकादायक वळणावर अंदाज न आल्याने भरधाव टँकर पलटल्याने टँकर मधील हजारो लिटर डिझेल रस्त्यावर सांडले आहे. तर टँकर पलटल्यानंतर नागरिकांनी डिझेल घेण्यासाठी एकच झुंबड केल्याचे ही बघायला मिळाले आहे. परिणामी नगर- पुणे रोडवर जवळ जवळ दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत डिझेल टँकरवर साबण मिश्रित (फॉग)पाणी उडवले आहे. तसेच नगर तालुका पोलीस आणि अग्निशामक दल देखील घटना स्थळी दाखल झाले आहे.
दुचाकी स्वाराला वाचवताना स्कार्पिओ पलटली
श्रीरामपूर तालुक्यातील नांदूर येथे दुचाकीस्वाराला वाचवताना स्काॅर्पीओ गाडी पलटल्याची घटना घडलीय. या अपघातात गाडीत बसलेले पाच तरुण जखमी झाले असून त्यांच्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर इतर तिघांवर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. सदर पाचही तरुण श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील रहिवासी आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

