एक्स्प्लोर

Rajya Sabha Election 2022 : बाळासाहेबांचा आशीर्वाद पाठिशी, साहेब नक्की विजयी होणार; संजय पवारांच्या पत्नी ज्योस्त्ना यांना विश्वास

महाविकास आघाडीचे सर्व आमदार पवार साहेब यांच्या पाठीशी उभे राहतील, संजय पवार साहेब यांचा विजय (Rajya Sabha Election 2022) होईल, असा विश्वास संजय पवार त्यांच्या पत्नी जोस्त्ना पवार यांनी व्यक्त केला.

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या विजयासाठी घरी पूजाअर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे सर्व आमदार पवार साहेब यांच्या पाठीशी उभे राहतील, संजय पवार साहेब यांचा विजय होईल, असा विश्वास संजय पवार त्यांच्या पत्नी ज्योस्त्ना पवार यांनी व्यक्त केला.

बाळसाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद कायम राहिला आहे, त्यामुळे शाखा प्रमुख ते खासदार असा प्रवास नक्की होईल, असा विश्वास त्यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला. दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) मतदान सुरु झाले आहे. महाराष्ट्रात सहा जागांसाठी मतदान होत आहे. राज्यसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू सुरुवातीपासूनच कोल्हापूर जिल्हा राहिला आहे. 

संभाजीराजेंनी शिवसेनेकडून शिवबंधन नाकारल्यानंतर संजय पवारांच्या (Sanjay Pawar) गळ्यात उमेदवारीची माळ पडली, तर भाजपनेही राजकीय खेळी करताना धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना उमेदवारी देत निवडणुकीतील चुरस वाढवली. सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात थेट लढत होत आहे.

कोल्हापुरात राजकीय उत्सुकता शिगेला

संभाजीराजेंनी शिवसेनेचा प्रस्ताव नाकारल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी मिळाली. त्यांच्या विजयासाठी शिवेसेनेने चांगलीच कंबर कसली आहे. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ संजय पवार शिवसेनेमध्ये सक्रीय आहेत. दुसरीकडे भाजपने धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवत कोल्हापूरच्या दोन मल्लांमध्ये कुस्ती लावून दिली आहे. 

जिल्ह्यात महाडिक गटाला विजयाची चव चाखता आलेली नाही. त्यामुळे महाडिक यांनीही विजयासाठी गेल्या काही दिवसांपासून पायाला भिंगरी लावली होती. त्यांचे कट्टर राजकीय विरोधक पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनीही महाडिकांना रोखण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे विजयी गुलाल कोण उधळणार याचे उत्तर आज संध्याकाळी साडे सातपर्यंत मिळेल. मात्र, कुस्ती कोण मारणार ? याची उत्सुकता कोल्हापुरात शिगेला पोहोचली आहे. 

कोणाकडे किती मतं आहेत ? 

शिवसेनेचे 55 आमदार, राष्ट्रवादी 53, काँग्रेस 44, भाजप 106, बहुजन विकास आघाडीचे (BVA) तीन, समाजवादी पक्ष, एआयएमआयएम आणि प्रहार जनशक्ती पक्ष प्रत्येकी दोन, मनसे, माकप, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, जनसुराज्य शक्ती पक्ष, क्रांतिकारी शेतकरी पक्ष यांचा प्रत्येकी एक आमदार आणि 13 अपक्ष आमदार आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट सामना होणार आहे. महाविकास आघाडी आणि भाजप छोटे पक्ष आणि अपक्ष यांच्या 25 इतर मतांवर विसंबून आहेत.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : महायुतीत खलबंत ते ठाकरेंची पालिकेसाठी रणनीती; झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषणBharat Gogawale Zero Hour : पाऊण तास खलबतं...शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत काय ठरलं? गोगावले EXCLUSIVEZero Hour Ramakant Achrekar Memorial : आचरेकर सरांच्या स्मारकाचं राज - सचिन यांच्या हस्ते उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget