एक्स्प्लोर

Vishalgad : शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यापासून रोखलं; शांतता प्रस्थापित करायला जाणाऱ्या महाराजांना का रोखताय, सतेज पाटलांचा सवाल

Vishalgad : कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांना विशाळगड परिसरात जाण्यापासून पोलिसांनी रोखलं होतं. यावेळी सतेज पाटील यांनी 15 लोकांना सोडण्याची मागणी केली.

कोल्हापूर :  कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज (Shahu Chattrapati), आमदार सतेज पाटील (Satej Patil) हे विशाळगडाच्या  (Vishalgad Encroachment) दिशेनं रवाना झाले होते. यावेळी त्यांना प्रशासनानं पांढरेपाणी येथे रोखलं. जमावबंदी लागू असल्यानं शाहू छत्रपती यांना रोखण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी यावेळी पत्रकारांची देखील अडवणूक केली. पत्रकारांवर काठी उगारली असल्याची माहिती आहे. सतेज पाटील यांनी किमान 15 लोकांना विशाळगडावर जाऊ देण्याची मागणी केली आहे. 

कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी काल विशाळगडाची पाहणी करणार असल्याचं सांगितलं होतं. त्याप्रमाणं शाहू महाराज विशाळगडाच्या परिसराची करण्यासाठी रवाना झाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना पांढरेपाणी येथे रोखलं.  आमदार सतेज पाटील यांनी ज्यांची घरं पेटवली,वाहनांचं नुकसान झालं त्याची पाहणी करण्यासाठी जाणाऱ्यांना रोखताय. ज्यांनी नुकसान केलं त्यांना काहीच करत नाही, असं सतेज पाटील म्हणाले. शांतता प्रस्थापित करायला जात आहोत. शिधा आणला आहे, ज्यांची घरं पेटवली आहेत त्यांना मदत करायला सर्वपक्षीय लोक जात आहोत. आम्हाला केवळ 15 लोकांना तिथं जाऊद्यात, असं सतेज पाटील म्हणाले. 15 लोकांना सोडायची लोकशाहीत परवानगी नाही का असा सवाल सतेज पाटील यांनी केला. 

विशाळगड परिसरात नुकसान झालेल्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील शाहू छत्रपती यांनी केली होती. ही घटना म्हणजे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अपयश असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.  

घटनेपूर्वी आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या होत्या.  हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार शाहू छत्रपती यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते  जितेंद्र आव्हाड यांनी शाहू महाराजांना विशाळगडकडे जाण्यापासून अडवणूक केली जाते ही दुर्दैवाची बाब आहे, असं म्हटलं. 

ज्या शाहूंनी देशाला समता शिकवली त्यांच्या वारसाला अडवलं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. ज्यांना अडवायला पाहिजे होत त्यांना अडवलं नाही. हा सरकारचा प्लॅन आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. काल पाठवलेले धारकरी होते, त्यांना कोणी पाठवलं हे मला सांगायला लावू नका, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

संबंधित बातम्या :

विशाळगड हिंसाचारप्रकरणी MIM आक्रमक, राज्यभरातील कार्यकर्त्यांसह धडकणार कोल्हापूरात, इम्तियाज जलील यांच्या सूचना

Imtiyaz Jaleel on Vishalgad Issue : कुठे छ. शाहू महाराज आणि कुठे जाळपोळीचं नेतृत्व करणारे तुम्ही, इम्तियाज जलील यांचे संभाजीराजेंना खडे सवाल!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget