एक्स्प्लोर

BJP on Sharad Pawar : आगामी निवडणुका शरद पवारांची शेवटची लढाई, भाजपने पुन्हा डिवचलं

आगामी निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar election) यांची शेवटची लढाई आहे, असा हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawabkule BJP) यांनी केला.

कोल्हापूर : आगामी निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar election) यांची शेवटची लढाई आहे, असा हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawabkule BJP) यांनी केला. गेल्या आठवड्यात (7 ऑक्टोबर ) चंद्रशेखर बावनकुळे कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर होते. बावनकुळे यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

शरद पवारांची शेवटची लढाई

बावनकुळे म्हणाले, "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा विचार सोडून शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे गेले. शरद पवारांनी कुटुंब आणि जनतेलाही गृहित धरले. त्यामुळे ठाकरे आणि पवार एकाकी पडले. शरद पवार तर शेवटची लढाई लढत आहेत. पवारांकडे शिल्लक असलेले कार्यकर्ते आणि पक्ष शोधावा लागत आहे"

महायुतीमध्ये भाजपाची भूमिका मोठ्या भावाची 

भाजपाचा विकासाच्या राजकारणावर विश्वास आहे. जो पक्ष विकास करू शकतो त्याच पक्षाच्या मागे लोक उभे राहतात. म्हणूनच अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना समर्थन मिळत आहे. महायुतीमध्ये भाजपाची भूमिका मोठ्या भावाची आहे. आम्ही पक्षापेक्षा देशासाठी काम करणारे लोक आहोत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे किंवा अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यात गैर काहीच नाही, असं बावनकुळे म्हणाले.

लोकसभेला 45, विधानसभेला 225 जागा जिंकणार

दरम्यान, महाराष्ट्रात महायुतीच जिंकणार, असा विश्वास यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्त्वात महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्त्वात महायुती लोकसभेच्या 45 हून अधिक तर विधानसभेच्या 225 हून अधिक जागांवर विजय मिळविणार आहे. भाजपा राज्यभरात ‘घर चलो अभियान आणि महाविजय-2024’ राबवित असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे", असा दावा बावनकुळेंनी केला. 

पश्चिम महाराष्ट्रात शक्तीप्रदर्शन

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. यावेळी त्यांनी कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातही जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.  बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना इस्लामपुरातून (Islampur) जाहीर आव्हान दिलं. भाजप सांगली (Sangli News) जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मिळून 225 आमदार निवडून येतील. निशिकांत पाटील यांना आता 440 व्होल्टची ऊर्जा द्यायची, असे म्हणत बावनकुळेंनी  जयंत पाटील यांच्या होमपिचवर आव्हान दिले. 

संबंधित बातम्या

Chandrashekhar Bawankule : थेट इस्लामपुरातून चंद्रशेखर बावनकुळेंचं जयंत पाटलांना जाहीर आव्हान; म्हणाले, मी दिल्लीवारी करेन पण...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jay Pawar on Shrinivas Pawar : तब्बेत बरी नसताना दादांची आई सभेला? जयने घटनाक्रम सांगितलाSanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास! विरार कॅशप्रकरणी संजय राऊतांची तुफान टोलेबाजी...Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरPravin Darekar Full PC : विरार कॅश कांड ते ठाकरेंची बॅग चेक, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Embed widget