एक्स्प्लोर

Nitin Gadkari : कोल्हापूर देशातील पहिल्या तीन जिल्ह्यात पोहोचेल इतकी ताकद; नितीन गडकरींनी दाखवला विकासाचा महामार्ग

कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा कोल्हापूर बास्केट ब्रिजची पायाभरणी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

Nitin Gadkari : कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा कोल्हापूर बास्केट ब्रिजची पायाभरणी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी गडकरी यांनी बास्केट ब्रिजमुळे कितीही पाऊस आला, तरी कोल्हापूरची वाहतूक विस्कळीत होणार नाही, वाहतूक थांबणार नाही अशी ग्वाही दिली. कोल्हापुराला 75 ई-बस मिळवून देण्यासाठी नक्की प्रयत्न करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.  नागपुरात मी सासऱ्याचेही घर तोडले, कोल्हापूरला तोडावं लागेल, पुनर्वसन करता येईल, या शहरातील रस्ते मोठे झाले पाहिजेत, शहर सुंदर झालं पाहिजे, मार्केट झालं पाहिजे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. कोल्हापूर देशातील पहिल्या तीन जिल्ह्यात पोहोचेल इतकी ताकद असल्याचेही ते म्हणाले. 

मी दिल्लीत गेलो की मला कफ होतो, पण इथं तीन राहिलो, पण कफ झाला नाही. दिल्लीत राहणं म्हणजे आयुष्य कमी केल्यासारखं आहे. त्यामुळे जल, हवा आणि ध्वनिप्रदूषण कमी केलं पाहिजे. यासाठी कोल्हापूरच्या खासदारांनी प्रयत्न करावेत. आपल्याला निरोगी जीवन प्राप्त झालं पाहिजे, असा श्वाश्वत विकास झाला पाहिजे, आणि मग स्मार्ट सिटी होईल. माझ्या विभागाकडून जेवढी मदत करता येईल, तेवढी मी करेन, असेही त्यांनी सांगितले.  

यावेळी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी सांगली-कोल्हापूर या रस्त्याकडे लक्ष देण्याची मागणी केल्यानंतर हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करू, पुढील 50 वर्षे या रस्त्यावर खड्डा पडणार नाही, याची खात्री देतो असे त्यांनी यावेळी सांगितले. सातारा ते कागल या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी दोन पॅकेजेस करण्यात आले आहेत. यामधील एक टप्पा अदानी ग्रुपला आणि अन्य एक टप्पा दुसऱ्या ठेकेदाराला गेला आहे. मात्र, त्यांची क्षमता नसल्याचे जाणवते. त्यांनी अन्यही कामे घेतली आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा व्हेरिफाय करून आपण कामाला लवकरात लवकर सुरुवात करू, असे ते म्हणाले. 

नितीन गडकरी पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्यामध्ये राज्य सरकारची चारशे एकर जागा आहे. ती जागा मिळाल्यास आयात, निर्यात कोल्हापुरातून सुरू होईल. त्यासाठी समुद्र शोधण्याची गरज नाही असेही त्यांनी सांगितले. येथील शेतकऱ्यांना अन्नदातासोबत तुम्ही उर्जादाताही बनवले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. नवनवीन यंत्रणा येत आहे, त्याची माहिती घेतली पाहिजे. खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या भाषणातून कोल्हापूर शहरातील अन्य ज्या ज्या ठिकाणी सध्या उड्डाणपूलाची गरज आहे याची माहिती दिली होती. यावर बोलताना ते म्हणाले की, या संदर्भात जर नगरोत्थान योजनेतून जमीन उपलब्ध करून दिल्यास  मी नक्कीच याबाबत विचार करेन, असे सांगितले. महाडिक यांनी जी यादी दिली आहे ती त्याचा डीपीआर बनवण्यास सांगितल्याचेही त्यांनी सांगितले. 

महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, पन्हाळा, जोतिबा या ठिकाणी रोपवे केबल सुरू करण्याची मागणी सुद्धा केली होती. त्या संदर्भात त्यांनी सकारात्मकता दर्शवताना त्यांनी सांगितले की जर पीडब्ल्यूडीकडून प्रस्ताव आल्यास नक्कीच माझ्या मंत्रालयाकडून प्रश्न प्रयत्न केले जातील. पुण्यातील गुंतवणूक कोल्हापूरकडे आणण्याच्या दृष्टीने येथील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. ट्रॅक्टरचे सर्वाधिक पार्ट हे कोल्हापूरमध्ये तयार होतात, तर ट्रॅक्टर का या ठिकाणी बनवत नाही? कोल्हापूरला विकासाच्या दृष्टीने नेण्यासाठी एकत्रित होऊन प्रयत्न करा असे त्यांनी यावेळी आवाहन केले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget