एक्स्प्लोर

Radhanagari Dam : राधानगरी धरणाचे फक्त 4 मिनिटांत दोन दरवाजे पुन्हा उघडले, धरणातून 7 हजार 312 क्युसेक विसर्ग सुरु  

राधानगरी धरणाचे एकूण 4 दरवाजे (3, 4, 5, 6 ) उघडले आहेत. धरणाच्या पाॅवर हाऊसमधून 1600 क्युसेक, तर उघडलेल्या 4 दरवाज्यातून 5712 क्युसेक विसर्ग होत असल्याने 7 हजार 312 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

Radhanagari Dam : कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात पावसाने उघडीप दिली असली, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने धरणांच्या तसेच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आज सायंकाळी 4 वाजून 11 मिनिटांनी बंद झालेले स्वयंचलित 3 दार उघडले. त्यानंतर चार मिनिटांच्या फरकाने चौथे दारही उघडले. 

त्यामुळे राधानगरी धरणाची एकूण 4 दरवाजे (3, 4, 5, 6 ) उघडले आहेत. धरणाच्या पाॅवर हाऊसमधून 1600 क्युसेक, तर उघडलेल्या 4 दरवाज्यातून 5712 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे राधानगरी धरणातून एकूण विसर्ग 7 हजार 312 क्युसेकने सुरू आहे. पाटबंधारे विभागाने याबाबत माहिती दिली आहे. 

दरम्यान, पंचगंगेची पातळी सकाळपासून स्थिर आहे. सायंकाळी चार वाजता राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी 41 फुट 8 इंच इतकी झाली आहे. पंचगंगा सध्या इशारा पातळीवरून वाहत असून तिची धोका पातळी 43 फुट आहे. जिल्ह्यातील 73 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 

जिल्ह्यातील कोणते बंधारे पाण्याखाली आहेत?

  • पंचगंगा नदी- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ
  • भोगावती नदी- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, शिरगांव, तारळे व खडक कोगे
  • कासारी नदी- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन व कुंभेवाडी
  • कडवी नदी- सवते सावर्डे, शिरगांव, सरुड पाटणे, कोपार्डे, भोसलेवाडी व वालुर
  • वेदगंगा नदी- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे, गारगोटी, शेणगांव व शेळोली
  • घटप्रभा नदी- कानर्डे सावर्डे, हिंडगांव व अडकूर
  • वारणा नदी- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदुळवाडी, शिगांव, खोची, मांगलेसावर्डे, चावरे व दानोळी
  • दुधगंगा नदी- दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली, बाचणी, सुळंबी, तुरंबे व वाळवे
  • कुंभी नदी- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडुकली
  • तुळशी नदी- बीड, आरे व बाचणी
  • ताम्रपर्णी नदी- कुर्तनवाडी, चंदगड, कोवाड, हल्लारवाडी व कोकरे 
  • धामणी नदी- सुळे व आंबर्डे
  • हिरण्यकेशी नदी- निलजी, ऐनापूर, गिजवणे व चांदेवाडी

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा 

राधानगरी 234.76 दलघमी, तुळशी 91.53 दलघमी, वारणा 883.92 दलघमी, दूधगंगा 610.34 दलघमी, कासारी 64.49 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 66.82 दलघमी, पाटगाव 94.61 दलघमी, चिकोत्रा 40.72 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, आंबेआहोळ 30.98 जंगमहट्टी, जांबरे, चित्री मध्यम प्रकल्प व कोदे लघू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे

हातकणंगले- 3.4 मिमी, शिरोळ -1.3 मिमी, पन्हाळा- 28.7 मिमी, शाहूवाडी- 38.1 मिमी, राधानगरी- 63.4 मिमी, गगनबावडा- 55.4 मिमी, करवीर- 8.8 मिमी, कागल- 14.1 मिमी, गडहिंग्लज- 12.7 मिमी, भुदरगड- 32.4 मिमी, आजरा- 65 मिमी, चंदगड- 52.7 मिमी असा एकूण 26.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane : मुस्लिमांसबत व्यवहार करायचा नाही, नितेश राणेंचं टोकाचं वक्तव्यSitaram Yechury Demise : सीताराम येचुरी यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरु होते उपचारRajesaheb Deshmukh  : बीडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांनी घेतली शरद पवारांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
Embed widget