एक्स्प्लोर

जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवलेंच्या निवडीनंतर कोल्हापुरात ठाकरे गटात नाराजीची मशाल धुमसू लागली; उपनेते संजय पवार भूमिका स्पष्ट करणार

रविकिरण इंगवले आणि शिवसेना ठाकरे गटातील उपनेते संजय पवार यांच्यातील वाद नवी नसला, तरी इंगवले यांची जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याने संजय पवार यांच्या नाराजीमध्ये वाढ झाली आहे.

Shiv Sena Kolhapur: शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पदाधिकारी एका बाजूला आणि नेते एका बाजूला अशी अवस्था शिवसेना ठाकरे गटाची झाली आहे. मात्र पदाधिकाऱ्यांमधील वाद अजूनही कायम आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले यांची निवड झाल्यानंतर शिवसेनेमध्ये नाराजीची मशाल आता धुमसू लागली आहे त्यामुळे उरल्या सुरल्या शिवसेना ठाकरे गटामध्ये आता आणखी एक भूकंप होणार का? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. रविकिरण इंगवले आणि शिवसेना ठाकरे गटातील उपनेते संजय पवार यांच्यातील वाद नवी नसला, तरी इंगवले यांची जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याने संजय पवार यांच्या नाराजीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटलं आहे. 

हर्षल सुर्वे यांनी सुद्धा इंगवले यांच्यावर टीका केली

दुसरीकडे, हर्षल सुर्वे यांनी सुद्धा आपण जिल्हाप्रमुख निवडीमध्ये आघाडीवर असताना आपलं नाव डावललं गेल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे. हर्षल सुर्वे यांनी सुद्धा इंगवले यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे एक प्रकारे रविकिरण इंगवले यांच्या निवडीनंतर ठाकरे गटामध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यांनी सुद्धा दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे त्यामुळे पदाधिकाऱ्यांमधील नाराजी ठाकरे गटाला आणखी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा पक्षाची वाताहत झाली. पक्षाला जिल्ह्यामध्ये जागा राखता आलेली नाही. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ सुद्धा काँग्रेसच्या वाट्याला गेला आहेय अशा पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई सुरू असताना पदाधिकाऱ्यांमधील वाद मात्र काही केल्या थांबण्यास तयार नाही. 

रवीकरण इंगवले आणि संजय पवार कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून इच्छुक

विधानसभा निवडणुकीसाठी रवीकरण इंगवले आणि संजय पवार हे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने हा मतदारसंघ कोणाकडे जाणार याचीचर्चा रंगली होती. मात्र मतदारसंघाची चर्चा सुरू असतानाच रविकिरण इंगवले आणि संजय पवार यांची मात्र एकमेकांवर कुरघोडी सुरू होती. इतकेच नव्हे तर या वादाचा एक ऑडिओ कॉल सुद्धा व्हायरल झाला होता. पक्ष अडचणीत असताना एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. असं असतानाही संजय पवार चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचे रविकिरण यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे म्हटलं होतं. त्यामुळे आता इंगवले जिल्हाप्रमुख झाल्याने संजय पवार कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष असेल. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News : घरगुती वाद विकोपाला, पतीच्या जबर मारहाणीत पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
घरगुती वाद विकोपाला, पतीच्या जबर मारहाणीत पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'जनसुराज्य-भाजप हे दोन शरीर आणि एक आत्मा त्यामुळे...' झेडपी अध्यक्षपदावर खासदार धनंजय महाडिकांनंतर चंद्रकातदादांनी सुद्धा कोल्हापूर मनपातून थेट गणित सांगितलं!
'जनसुराज्य-भाजप हे दोन शरीर आणि एक आत्मा त्यामुळे...' झेडपी अध्यक्षपदावर खासदार धनंजय महाडिकांनंतर चंद्रकातदादांनी सुद्धा कोल्हापूर मनपातून थेट गणित सांगितलं!
कोल्हापूर झे़डपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली; जास्त जागा जिंकलेल्या मुश्रीफांनी अध्यक्षपदावर शड्डू ठोकताच महाडिकांनी एकूण मतांची बेरीज मांडत अध्यक्षपदाची केली मागणी
कोल्हापूर झे़डपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली; जास्त जागा जिंकलेल्या मुश्रीफांनी अध्यक्षपदावर शड्डू ठोकताच महाडिकांनी एकूण मतांची बेरीज मांडत अध्यक्षपदाची केली मागणी
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ishan Kishan: मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
Raj Thackeray Meets Eknath Shinde: राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
Crime News: दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
Satara : साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार, एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, मकरंद पाटील-शंभूराज देसाईंच्या भेटीत निर्णय 
मकरंद पाटील- शंभूराज देसाईंंच्या भेटीत एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, सातारा जिल्हा परिषदेवर शिवसेना- राष्ट्रवादीची सत्ता येणार
Rohit Pawar and Naresh Arora: माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय, कॅश बॉक्सवाल्यांनो 'रोक सके तो रोक लो', रोहित पवारांचा नरेश अरोरांवर हल्लाबोल
रोहित पवारांचा नरेश अरोरांना इशारा, म्हणाले, 'मला माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड लागलंय, तुला किती पैसा....'
Pune Crime News: बुधवार पेठेत पोलिसांची छापेमारी; सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ११ बांगलादेशी महिला, दलालांसह कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात कारवाईचा दिला आयुक्तांनी इशारा
बुधवार पेठेत पोलिसांची छापेमारी; सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ११ बांगलादेशी महिला, दलालांसह कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात कारवाईचा दिला आयुक्तांनी इशारा
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर 'हा' नेता होणार होता प्रदेशाध्यक्ष; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर 'हा' नेता होणार होता प्रदेशाध्यक्ष; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
मोठी बातमी : राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीचा तपशील समोर, भाई म्हणाले, Thank You, राज ठाकरेही म्हणतात, सहकार्य राहील!
मोठी बातमी : राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीचा तपशील समोर, भाई म्हणाले, Thank You, राज ठाकरेही म्हणतात, सहकार्य राहील!
Embed widget