Dahi Handi in Kolhapur : कोल्हापूर शहरात 'या' आठ ठिकाणांवर आज दहीहंडीचा थरार!
कोल्हापूरमध्ये आज (Dahi Handi in Kolhapur) पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीसह 8 ठिकाणी दहीहंडी थरार रंगेल. या पथकांवर पाच हजारांपासून ते तीन लाखांपर्यंत बक्षीसांची बरसात केली जाणार आहे.
Dahi Handi in Kolhapur : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने आनंदावर विरजण घातल्याने अनेक सार्वजनिक तसेच धार्मिक कार्यक्रमांवर संक्रांत आली होती. मात्र, यंदा कोरोना संकट मागे सरल्याने आणि राजकारण्यांनी सुद्धा हात सैल केल्याने राज्यभरात दहीहंडीचाआज थरार पाहायला मिळत आहे.
कोल्हापूर शहरात आज (Dahi Handi in Kolhapur) पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीसह 8 ठिकाणांवर दहीहंडीचा थरार रंगणार आहे. या पथकांवर पाच हजारांपासून ते तीन लाखांपर्यंत बक्षीसांची बरसात केली जाणार आहे. पाच ते सहा थरांची सलामी देणाऱ्यांनाही बक्षी दिलं जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी असणारी धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडी थरार तीन वर्षांनंतर प्रथमच दसरा चौकात रंगेल. संध्याकाळी सहा वाजता या दहीहंडीला सुरुवात होईल. शिवसेनेकडूनही दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून तिचा थरार बिंदू चौकात रंगणार आहे.
युवाशक्तीच्या दहीहंडी विजेत्या गोविंदा पथकास 3 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. महिला गोविंदा पथकासही प्रोत्साहानपर म्हणून 25 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या दहीहंडीला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, सुरेश हाळवणकर, भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनेची दहीहंडी बिंदू चौकात रंगणार
कोल्हापूर शहर शिवसेनेकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. बिंदू चौकात दुपारी 3 वाजता निष्ठा दहीहंडी रंगणार आहे. या दहीहंडी स्पर्धेत विजेत्या गोविंदा पथकाला एक लाख रुपयांचे बक्षीस दिलं जाणार आहे. शिवसेनेकडूनही दहीहंडीवेळी रोषणाई, नृत्याविषष्कार आयोजित करण्यात आला आहे.
या ठिकाणी रंगेल दहीडंडीचा थरार
- धान्य व्यापारी मंडळ लक्ष्मीपूरी
वेळ - दुपारी 3.30 वाजता
- बावडेकर आखाडा, शिवाजी पेठ
वेळ - दुपारी 4 वाजता
- भाऊ नाईक गल्ली, गंगावेश
वेळ दुपारी 4 वाजता
- मनसे दहीहंडी, गुजरी काॅर्नर, भाऊसिंगजी रोड
वेळ सायं. 5 वाजता
- न्यू गुजरी मित्र मंडळ, गुजरी काॅर्नर
वेळ सायं. 5 वाजता
- भगवी दहीहंडी, शिवाजी चौक
वेळ - सायं. 5 वाजता
- शिवसेना दहीहंडी, बिंदू चौक
वेळ - सायं. 5 वाजता
- महाडिक युवाशक्ती, दसरा चौक
सायं. 6 वाजता.