Samarjitsinh Ghatge Vs Hasan Mushrif : समरजितसिंह घाटगेंच्या पत्नीचा एकेरी उल्लेख केल्याने कागलमध्ये हसन मुश्रीफांविरोधात महिलांचा मोर्चा
समरजितसिंह घाटगे यांच्या पत्नी नवोदिता यांचा एकेरी उल्लेख झाल्याचा आरोप करत कागलमध्ये आज हसन मुश्रीफ यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मुश्रीफ यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.
Samarjitsinh Ghatge Vs Hasan Mushrif : कागल तालुक्यात भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील राजकीय संघर्ष वाढतच चालला आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असतानाच आज त्यामध्ये आणखी एका वादाची भर पडली आहे.
समरजितसिंह घाटगे यांच्या पत्नी नवोदिता यांचा मुश्रीफ गटाकडून एकेरी उल्लेख झाल्याचा आरोप करत कागलमध्ये आज हसन मुश्रीफ यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मुश्रीफ यांनी मागणी मागावी अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, या प्रकारानंतर नवोदिता घाटगे यांनी सोशल मीडियामध्ये व्हिडिओ पोस्ट करून हसन मुश्रीफ यांच्यावर हल्ला चढवला आहे.
हा प्रकार पहिलाच नसून यापूर्वी अनेकदा मुश्रीफ गटाकडून एकेरी उल्लेख झाल्याचा आरोप नवोदिता घाटगे यांनी केला. गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशाप्रकारे करत असाल तर हे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकेरी उल्लेख झाल्याने महिलांना वाईट वाटल्याने त्यांनीच हा मोर्चा काढल्याचे त्या म्हणाल्या. आम्ही कधीही मुश्रीफ यांचा उल्लेख केला नसल्याचा दावाही त्यांनी केला. हसन मुश्रीफ जे बोलतात तेच त्यांचे कार्यकर्ते बोलतात असा आरोपही नवोदिता घाटगे यांनी केला.
दरम्यान, समरजितसिंह घाटगे यांनी राज्यपालांच्या आशीर्वादाने नाही, तर मुश्रीफांना पाडून आमदार होणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर मुश्रीफ यांनी माझा पराभव करणारा जन्माला यायचा असल्याचा पलटवार केला होता. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी रावणालाही असेच वाटत होते, असा खोचक टोला लगावत रामराज्य आणायचं की नाही, हे सर्वस्वी आता कागलची जनताच ठरवेल, असे प्रत्युत्तर दिले.
इतर महत्त्वाच्या बातम्या