एक्स्प्लोर

Kolhapur News : म्हणून आम्ही तीन गावात मोर्चा काढला नाही! सतेज पाटलांचा खोचक टोला

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सर्वात संवेदनशील असणाऱ्या उचगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालावरून (Uchagaon Gram Panchayat Election Result) वादाची ठिणगी पडली आहे.

kolhapur district gram panchayat election : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सर्वात संवेदनशील असणाऱ्या उचगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालावरून (Uchagaon Gram Panchayat Election Result) वादाची ठिणगी पडली आहे. सोमवारी उचगावच्या ग्रामस्थांनी मोर्चा काढताना निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निकालावरून सतेज पाटील आणि महाडिक गटात वादाची चिन्हे दिसत आहेत. 

उचगावच्या ग्रामस्थांनी (Gram Panchayat Uchagaon Election Result) निवडणुकीत अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. तसेच आचारसंहिता लागू असताना माजी मंत्र्यांनी कोपरा सभा घेतल्या, त्यांच्या पीएचा निकालात हस्तक्षेप झाला असून त्यामुळे निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. ग्रामस्थांकडून जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक आयोग, ग्रामपंचायत आणि गांधीनगर पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.  

दरम्यान, ग्रामस्थांनी काढलेल्या मोर्चानंतर आमदार सतेज पाटील यांनी (Satej Patil on Gram Panchayat Uchagaon Election Result) प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नाव न घेता महाडिक गटाला टोला लगावला. सतेज पाटील म्हणाले की, लोकशाहीत परत निवडणुका घ्यायची पद्धत असती, तर आम्ही 2019 ची निवडणूक घ्या म्हटले असते. आमची मागणी लोकसभेची होती. ते पुढे म्हणाले की, ईव्हीएममध्ये मतदानाची नोंद होत असते. मतमोजणीवेळी पोलिंग एजंट असतात. संशय घेण्यापेक्षा निकाल मान्य केला पाहिजे, लोकशाहीत हे चालत असतं. तीन गावात आमचा सरंपच झालेला नाही, फेरमतदान घ्या म्हणून गांधीनगर असेल, कंदलगाव असेल आम्ही मोर्चा काढलेला नाही. पराभव पचवण्याची ताकद पाहिजे. 

दरम्यान, उचगाव ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, आचारसंहितेच्या काळात माजी मंत्र्यांनी 17 डिसेंबरला सकाळी 10 ते रात्री अकरापर्यंत वाॅर्ड 1 ते 6 मध्ये पदयात्रा, कोपरासभा घेत असताना विरोधी कार्यकर्त्यांनी विचारणा केल्यानंतर दमदाटी करण्यात आली. मतदानानंतर ईव्हीएम नेतानाही शासकीय अधिकारी नव्हता. त्यामुळे झालेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. पुढील आठ दिवसात ग्रामस्थांना निर्णय न कळवल्यास निवडणूक प्रशासकाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील गटाचे वर्चस्व

दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामधील 53 पैकी 31 ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस, 4 ग्रामपंचायतीमध्ये भाजप, चार ग्रामपंचायतींमध्ये नरके गट, 13 गावांमध्ये स्थानिक  आणि 2 ग्रामपंचायतीमध्ये सर्वपक्षीय आघाडी निवडून आली. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात येणाऱ्या 21 पैकी 18 ग्रामपंचायतींमध्ये सतेज पाटील, तर 3 ग्रामपंचायतीत महाडिक गटाची सत्ता आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर.
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर.
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरेDevendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर.
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर.
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Embed widget