एक्स्प्लोर

Old Pension : एकच मिशन, जुनी पेन्शन; जुन्या पेन्शन योजनेसाठी कोल्हापुरात 4 मार्चला भव्य मोर्चा

कोल्हापुरात अंजिक्यतारा संपर्क कार्यालयात जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

Old Pension : जुनी पेन्शन लागू करण्यासाठी कोल्हापुरात (Kolhapur News) 4 मार्च रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. याबाबत आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी माहिती दिली. कोल्हापुरात अंजिक्यतारा संपर्क कार्यालयात जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सतेज पाटील यांनी जुन्या पेन्शन योजनेविषयी संघटनांची मते यावेळी जाणून घेतली. शिक्षक, शासकीयसह राजपत्रित अधिकाऱ्यांचे ‘एकच मिशन- जुनी पेन्शन’ हे सरकारला दाखवून देण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात 4 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय सर्व शिक्षक संघटना, राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनेने घेतला आहे. 

जुन्या पेन्शनसाठी लढा उभारण्याची योग्य वेळ

यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, देशातील 5 राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. महाराष्ट्रातही ही योजना सुरू करावी यासाठी काँग्रेसने नेहमीच पुढाकार घेतला आहे. इतर राज्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातही हा निर्णय घेतला पाहिजे. राज्यात जुनी पेन्शन योजनाच 17 लाख कर्मचाऱ्यांचा शाश्‍वत आधार आहे. 70 वर्षांमध्ये शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या जोरावरच भारताने प्रगती केली आहे. त्यामुळे जुन्या पेन्शनसाठी लढा उभारण्याची आता योग्य वेळ आली आहे. सोमवारी अधिवेशन सुरू होत आहे. यामध्ये जुनी पेन्शन लागू करण्यासाठी लक्षवेधी मांडली जाईल. यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची जबाबदारी आपल्यावर राहील. 

दरम्यान, या बैठकीमध्ये नवीन योजना कशी फसवी आहे आणि जुन्या योजनेचे फायदे काय आहेत याविषयी संघटनांच्या प्रतिनिधींनी मते मांडली. शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. जयंत आसगावकर म्हणाले की, जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी नागपूर अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. यावेळी सरकार दिवाळखोरीत निघेल, असे उत्तर दिले. देशात महाराष्ट्र राज्य उत्पन्नात एक नंबर असून केवळ 4 टक्के रक्कम जूनी पेन्शनवर खर्च होणार आहे. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांची कुचंबना केली आहे. 

या बैठकीस समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर, कॉम्रेड अतुल दिघे, संस्था चालक संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड, शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे प्रा. रघुनाथ ढमकले, शिक्षक नेते दादा लाड, राजाराम वरूटे, दत्ता पाटील, खंडेराव जगदाळे, अनिल घाटगे, सी. एम. गायकवाड, मंगेश धनवडे, सुदेश जाधव यांच्यासह 90 संघटनांचे पदाधिकारी, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
Pimpri News : 'पिंपरीत मशिदीवर की मदरशावर कारवाई झाली? काळेवाडीतील कारवाई मागची वस्तुस्थिती आहे तरी काय?
'पिंपरीत मशिदीवर की मदरशावर कारवाई झाली? काळेवाडीतील कारवाई मागची वस्तुस्थिती आहे तरी काय?
Anganwadi Workers : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 03 PM : ABP MajhaSanjana Jadhav Accident : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीचा अपघातPune : धक्कादायक! पुण्यात उच्चशिक्षीत महिलेला 3.5 कोटी रुपयांना गंडाABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 30 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
Pimpri News : 'पिंपरीत मशिदीवर की मदरशावर कारवाई झाली? काळेवाडीतील कारवाई मागची वस्तुस्थिती आहे तरी काय?
'पिंपरीत मशिदीवर की मदरशावर कारवाई झाली? काळेवाडीतील कारवाई मागची वस्तुस्थिती आहे तरी काय?
Anganwadi Workers : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
खड्डा चुकवताना बीडमध्ये बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
खड्डा चुकवताना बीडमध्ये बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
Tirupati Laddu controversy : कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
Public Sector Banks: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी दरवाजे उघडले, युवकांना प्रशिक्षण देणार, 15 हजार मानधन रुपये मिळणार
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अप्रेंटिसशिपची संधी, दरमहा 15 हजार रुपये मिळणार, जाणून घ्या
Embed widget