Hasan Mushrif on Shahu Maharaj : संजय मंडलिकांच्या वक्तव्यावर हसन मुश्रीफ म्हणतात, शाहू महाराजांनी अर्ज भरताना फेरविचार करावा
संजय मंडलिकांच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या अजित पवार गटाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराजांनी उमेदवारी अर्ज भरताना फेरविचार करावा, असा विनंतीवजा सल्ला दिला आहे.
कोल्हापूर : शिंदे गटाचे खासदार आणि भाजप महायुतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय मंडलिक यांनी गडहिंग्लज तालुक्यात जाहीर प्रचार सभेत बोलताना करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांवर वादग्रस्त विधान कोल्हापुरात संतापाचा उद्रेक झाला आहे. यानंतर संजय मंडलिकांच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या अजित पवार गटाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराजांनी उमेदवारी अर्ज भरताना फेरविचार करावा, असा विनंतीवजा सल्ला दिला आहे.
काय म्हणाले, हसन मुश्रीफ?
हसन मुश्रीफ यांनी संजय मंडलिकांच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले की, मी स्वतः शाहू महाराज यांना निवडणुकीला उभा राहू नये म्हणून विनंती केली होती. राजकारण आलं, निवडणूक आली की टीका होणार हे बोललो होतो. आम्हाला शाहू महाराज यांच्याबद्दल आदर आहे. अजूनही वेळ गेली नाही उमेदवारी अर्ज भरायला वेळ असल्याने शाहू महाराज यांनी फेरविचार करावा, असा विनंतीवजा सल्ला दिला आहे. तुमच्यावर टीका होत राहणार आणि त्याचा आम्हाला देखील त्रास होईल, असेही मुश्रीफ म्हणाले.
संजय मंडलिक तोल सुटलेल्या वक्तव्यावर ठाम
संजय मंडलिक म्हणाले की, मी बोलताना एक शब्द चुकला.आताचे शाहू महाराज हे थेट वारसदार नाहीत, असं मला म्हणायचं होतं. शाहू महाराज यांनी दत्तक विधान झालं आहे की नाही हे त्यांनी सांगावं, दत्तक विधान कसं झालं हे देखील सांगावं? त्यामुळे मी शाहू महाराजांचा कोणताही अपमान केला नाही, असा दावा संजय मंडलिक यांनी केला.
संजय मंडलिकांविरोधात रोष
संजय मंडलिक यांनी श्रीमंत शाहू महाराजांवर वादग्रस्त विधान केल्यानंतर त्याचे पडसाद कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात उमटले. शाहू प्रेमी कोल्हापूरकरांनी दसरा चौकात निदर्शने करत मंडलिकांनी माफी मागावी, अशी मागणी केली. कोल्हापूरकरांसाठी आदराचे स्थान असणाऱ्या गादीबद्दल आणि शाहू महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संजय मंडलिकांचा निषेध करण्यासाठी दसरा चौकात जमली.
इतर महत्वाच्या बातम्या