एक्स्प्लोर

गडचिरोलीत 10,000 क्विंटल धान घोटाळा; अखेर गुन्हा दाखल, अध्यक्ष, उपाध्यक्षांसह 5 जणांना अटक

गडचिरोली जिल्ह्यात गाजलेल्या 2023-24 आणि 2024-25 या दोन वर्षात तब्बल 10 हजार क्विंटलची धान खरेदी तफावत देऊळगाव खरेदी केंद्रावर आढळून आली होती.

गडचिरोली : जिल्ह्यात चर्चेत असलेल्या धान घोटाळ्याप्रकरणी देऊळगाव (Gadchiroli) खरेदी केंद्राच्या 5 संचालकांना कुरखेडा पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. धान घोटाळा प्रकरणी खरेदी केंद्राच्या अध्यक्ष सचिवासह 17 जणांवर पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला होता. त्यातील दोघांना यापूर्वीच अटक झाली असून आता आणखी पाच जणांना अटक केल्याने अटकेतील आरोपींची संख्या 7 झाली आहे. पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्यांमध्ये संस्थेचे अध्यक्ष पतिराम कोकोडे, उपाध्यक्ष पंढरी दादगाये, आणि संचालक मंडळाचे सदस्य भाऊराव कवाडकर, नुसाराम कोकोडे आणि भीमराव शेंडे यांचा समावेश आहे. घोटाळ्यातील मुख्य आरोपी उप प्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे आणि संस्थेच व्यवस्थापक महेंद्र मेश्राम यांच्यासह 10 आरोपी अद्यापही फरार आहेत.

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात गाजलेल्या 2023-24 आणि 2024-25 या दोन वर्षात तब्बल 10 हजार क्विंटलची धान खरेदी तफावत देऊळगाव खरेदी केंद्रावर आढळून आली होती. त्याप्रकरणी, चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आल्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक हिंमतराव सोनवाने यांच्या लेखी फिर्यादीवरुन कुरखेडा पोलिसांनी आदिवासी महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे, प्रभारी विपणन निरीक्षक चंद्रकांत कासारकर, हितेश पेंदाम, महेंद्र विस्तारी मेश्राम यांच्यासह आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगावचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी अशा एकूण 17 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 316 (5), 318 (4), 3 (5) अन्वये गुन्हे दाखल केले होते.

दरम्यान, चंद्रकांत कासारकर व हितेश पेंदाम यांना आधीच अटक करण्यात आली. काल आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक व देऊळगावच्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे व्यवस्थापक महेंद्र मेश्राम हे अद्याप फरार आहेत. पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ प्रकरणाचा तपास करीत आहेत.

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतही धान घोटाळा

गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सचिव आणि केंद्रप्रमुखास धान घोटाळा प्रकरणी पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. किशोर पदा असे संस्था सचिवाचे, तर सुरेश पुंगाटी असे केंद्रप्रमुखाचे नाव आहे. संस्था अध्यक्ष सुधाकर पुंगाठी हे फरार आहेत. पुढे आलेल्या माहितीनुसार, खरीप हंगाम 2022-23 मध्ये खरेदी केलेल्या धान्यात 1.37 कोटी रुपये किमतीचे 13 हजार धानपोती कमी आढळली होती. या गैरव्यवहार प्रकरणी संस्थेच्या या तिघांसह मदतनीस प्रवीण दुर्गे, अहेरी येथील प्रभारी विपणन अधिकारी सोनाली पेंदाम या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र, या प्रकरणी तब्बल वर्षभरानंतर संस्थाप्रमुख आणि सचिवाला अटक करण्यात आली होती.  

हेही वाचा

फिरोज सय्यद निघाले पठाणकोटला; रेल्वे स्टेशनवर गाव जमलं 3 भूमिपुत्रांना 'बॉर्डर'वर सोडवायला

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंच्या शिवसेनेत पदाधिकाऱ्यांचा राडा, गडचिरोली जिल्हाध्यक्षांकडूनच कार्यालयाची तोडफोड; लातूरमध्येही गोंधळ
ठाकरेंच्या शिवसेनेत पदाधिकाऱ्यांचा राडा, गडचिरोली जिल्हाध्यक्षांकडूनच कार्यालयाची तोडफोड; लातूरमध्येही गोंधळ
Gadchiroli Crime News: संतापजनक... रंगकाम करणाऱ्या नराधमाचा 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; वैद्यकीय तपासणीनंतर उघड, आरोपीला बेड्या
संतापजनक... रंगकाम करणाऱ्या नराधमाचा 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; वैद्यकीय तपासणीनंतर उघड, आरोपीला बेड्या
Vidhan Parishad Election 2026: विजय वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्याला सुरंग; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषदेत अरुण लखानींचा बिनविरोध विजय; भाजपचा मास्टर प्लॅन यशस्वी, वाचा इनसाईड स्टोरी
विजय वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्याला सुरंग; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषदेत अरुण लखानींचा बिनविरोध विजय; भाजपचा मास्टर प्लॅन यशस्वी, वाचा इनसाईड स्टोरी
गडचिरोलीतील मायनिंग प्रकल्पाला आमचा विरोध, वन्यजीव संरक्षण नियम मोडून जंगल कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातली जातायेत, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 
गडचिरोलीतील मायनिंग प्रकल्पाला आमचा विरोध, वन्यजीव संरक्षण नियम मोडून जंगल कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातली जातायेत, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका- इराण शांतता कराराची घोषणा,  क्रूड ऑईलचे दर गडगडले, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी अपडेट
डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका- इराण शांतता कराराची घोषणा,  क्रूड ऑईलचे दर गडगडले, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी अपडेट
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Embed widget