Sambhajiraje Chhatrapati : शाहू महाराजांचे वय विचारता, मग मोदींचे किती? ते पैलवान आहेत; संभाजीराजेंनी जाग्यावर कोल्हापुरी कंडका पाडला!
शाहू महाराजांच्या वयावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना संभाजी राजे छत्रपती यांनी कोल्हापुरी भाषेत उत्तर देत कंडका पाडला. शाहू महाराजांचे वय विचारत असाल तर मोदींची वय किती? अशी विचारणा त्यांनी केली.
कोल्हापूर : महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Loksabha Election 2024) श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर आता खासदार माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी सुद्धा भूमिका स्पष्ट केली आहे. मोठ्या महाराजांच्या मागे एक हजार टक्के राहणार असल्याचा निर्धार राजेंनी व्यक्त केला. मी, मालोजीराजे आणि शाहू महाराज हे तिघेही ताकतीने एकत्रित काम करणार असल्याची ग्वाही आज कोल्हापूरमधून बोलताना संभाजी राजे छत्रपती यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून स्वराज्य संघटना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. मात्र, या सर्व चर्चांना संभाजी राजे छत्रपती यांनी पूर्णविराम देतानाच मोठ्या महाराजांसाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये पूर्ण ताकतीने उतरणार असल्याचे स्पष्ट केले.
शाहू महाराजांचे वय विचारत असाल तर मोदींची वय किती?
दरम्यान, शाहू महाराजांच्या वयावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना संभाजी राजे छत्रपती यांनी कोल्हापुरी भाषेत उत्तर देत कंडका पाडला. शाहू महाराजांचे वय विचारत असाल तर मोदींची वय किती? अशी विचारणा त्यांनी केली. ते म्हणाले की जेव्हा महाराज यावेळी निवडणुकीच्या रिंगणात का उतरलेत याचा विचार नक्कीच विचार केला असेल. ते कोल्हापूर मतदारसंघात पूर्ण क्षमतेने फिरतील. ते पैलवान आहेत आजही त्यांचा प्रवास खूप असतो असं ते म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्याचा विकास कसा केला जाईल याचा आम्ही विचार करत आहोत, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
ते म्हणाले की जो निर्णय महाराज घेतील त्या निर्णयाबरोबर मी आणि माझे सर्व कार्यकर्ते सोबत राहतील. निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण होईपर्यंत आम्ही आमचं काम थांबवणार नाही, आम्ही कुठेही कमी पडणार नाही. राज्यामध्ये स्वराज्य संघटना कुठेही निवडणुकीमध्ये उभा राहणार नाही असं त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एक प्रकारे कोल्हापूरच्या लोकसभेच्या जागेवर शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
संभाजीराजे यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, कोल्हापूर नेहमीच वेगळी दिशा देणारा शहर राहिलं आहे आणि ते देत राहील. कोल्हापूरची निवडणूक आमच्यासाठी महत्त्वाची आहे. कोल्हापूर आणि शाहू महाराजांची इच्छा आम्ही सर्वजण मिळून पूर्ण करू. हीच खरी वेळ आहे पूर्ण ताकतीने काम करण्याची आणि त्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेने काम करणार आहोत असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला नाही. शाहू महाराज आमच्यासाठी सर्वस्व असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या