(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajaram Karkhana : चार महिने उलटूनही सतेज पाटलांना दारुण पराभव पचलेला नाही; अमल महाडिकांचा हल्लाबोल
सभासद अपात्र ठरल्यानंतर सत्ताधारी आघाडीचे नेते आणि कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. त्यांनी पत्रक प्रसिद्धीस देत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापूर : राजाराम कारखान्यातील 1272 सभासदांना अपात्र ठरवण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी महाडिक आणि विरोधी असलेल्या पाटील गटामध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. सभासद अपात्र ठरल्यानंतर सत्ताधारी आघाडीचे नेते आणि कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. त्यांनी पत्रक प्रसिद्धीस देत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल पाहता मी स्वतः सर्वाधिक 2205 मतांनी व आमचे सत्तारूढ पॅनेलचे सर्व उमेदवार सरासरी 1600 मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे या सभासदांच्या जीवावर सत्ता मिळविली हे सतेज पाटलांचे वक्तव्य पोरकटपणाचे ठरते. खरे पाहता 21-0 झालेला दारूण पराभव त्यांना चार महिने उलटले तरीही पचवता आलेला नाही, हेच सुर्यप्रकाशा इतके खरे सत्य असल्याचा टोला अमल महाडिक यांनी लगावला आहे.
अवमान याचिका दाखल करणार
प्रादेशिक सहसंचालकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन न करता दिलेल्या या आदेशाविरोधात त्यांच्या विरुध्द सभासदांकडून अवमान याचिका देखील दाखल करणार आहोत. तसेच यासाठी पुन्हा एकदा आम्ही या सभासदांना न्याय देण्यासाठी या निकाला विरोधात राज्य सरकारकडे अपिल करणार आहोत. प्रादेशिक सहसचालकांचा आदेश हा समासदांच्या आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वाच्या विरोधातील असून या निकालाला स्थगिती मिळविल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
सभासदांमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न
अमल महाडिक यांनी म्हटले आहे की, प्रादेशिक सहसंचालकांनी दिलेल्या निकालानंरतर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलेली वक्तव्ये बालीशपणाची आहेत. या निकालाचा कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणूक निकालाशी कोणताही काडीचा संबंध नसताना कायदेशीर प्रक्रियेनुसार पार पडलेल्या निवडणुकीच्या संदर्भात करून ते सभासदांमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ म्हणजे फक्त राजकीय गट सांभाळणे एवढ्याच पुरता मर्यादित असून, त्यांच्या गटाच्या पराभूत उमेदवारांना मी काही तरी करून दाखवत आहे असे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.
या निकालामध्ये मोठीमोठी आकडेवारी सांगून सभासदामध्ये निष्कारण चुकीची माहिती सांगण्याची उठाठेव से करीत असून खूप मोठ्या संख्येने 1899 सभासदांचा प्रश्न असल्याचे ते भासवत आहेत. प्रत्यक्षात यापैकी 558 सभासद पात्र ठरले आहेत आणि 339 भादोले येथील सभासद मतदानास यापूर्वीच कारखान्याने उगळले होते. उर्वरित पैकी 107 सभासद मयत आहेत. 2 सभासद शेअर्स रद्द व अन्य नावे वर्ग झाले आहेत. ही संख्या विचारात घेता हा विषय 824 सभासदापुरताच संबंधित येतो. हे 824 सभासद सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने निवडणुकीवेळी पात्रच होते, असेही त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या