Rahul Gandhi disqualified : कोल्हापुरात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन, भाजप विरोधात आणखी आक्रमक आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या मार्गदर्शनात पापाची तिकटी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ सत्याग्रह आंदोलन करण्यात आल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.
Rahul Gandhi disqualified : राहुल गांधी यांची लोकसभेची खासदारकी रद्द केल्यानंतर आज कोल्हापुरात काँग्रेसकडून (Kolhapur News) सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर बसून निदर्शने करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे, त्याविरूद्ध कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या मार्गदर्शनात पापाची तिकटी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ सत्याग्रह आंदोलन करण्यात आल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.
काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनात आमदार पी एन पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजु बाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह आमदार जयश्री जाधव उपस्थित होत्या. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या सत्याग्रह आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी भाजपच्या विरोधात आणखी आक्रमक आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष सचिन प्रल्हाद चव्हाण, अॅड. गुलाबराव घोरपडे, शशांक बावचकर, संजय पोवार वाईकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते, प्रदेश पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, शहर ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUI, सेवादल, इंटक संघटना, ओबीसी सेल, अनुसूचित जाती विभाग, अल्पसंख्यांक सेल, असंघटित कामगार सेल, सांस्कृतिक सेल, परिवहन सेल, रोजगार स्वयंरोजगार सेल, अपंग सेल, माजी सैनिक संघटना, शिक्षक सेल तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
इतर महत्वाच्या बातम्या