Kolhapur News : दोन महिन्यांपासून पगार थकल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे आंदोलन
गेल्या दोन महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) शिक्षक संघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकदिवसीय धरणे आंदोलन केले.
Kolhapur News : गेल्या दोन महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक संघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. दोन महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने प्राथमिक शिक्षकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत उद्यापर्यंत 9 तालुक्यातील शिक्षकांचे पगार त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या सूचना सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा पगार गेल्या दोन महिन्यापासून झालेला नाही. थकलेला पगार मिळावा तसेच दर महिन्याच्या एक तारखेला पगार मिळावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिक्षक संघाने धरणे आंदोलन केले.यावेळी आंदोलक शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. प्रशासनाच्या इतर विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे पगार न थकता एक तारखेला होतात मग शिक्षकांवर अन्याय का ? असा सवालही यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला.
दरम्यान, धरणे आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी प्राथमिक शिक्षकांचे पगार झाल्याशिवाय मुख्य वित्त व लेखा अधिकारी व प्राथमिक शिक्षण अधिकरी यांचा पगार करू नये अशा सक्त सूचना दिल्या आहेत. यावेळी शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, शिक्षक नेते बी एस पाटील, डी पी पाटील सर, रवि नागटीळे,शिक्षक बँकेचे संचालक व शिक्षक संघातील सदस्य शिक्षक उपस्थित होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या