एक्स्प्लोर

Prakash Abitkar on Almatti Dam : तर आम्हीही तशीच वकिलांची आणि जलतज्ञांची फौज उभा करू; 'अलमट्टी'च्या उंचीवरून प्रकाश आबिटकरांचा कर्नाटकला इशारा

Prakash Abitkar on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला महाराष्ट्र सरकारचा विरोध असल्याचे केंद्राकडे स्पष्टपणे सांगितलं असल्याचे प्रकाश आबिटकर म्हणाले.

Prakash Abitkar on Almatti Dam : कर्नाटक सरकारचा अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी अट्टाहास कायम आहे. या संदर्भात कायदेशीर हालचाली करण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सुद्धा इशारा दिला आहे. जर कर्नाटक सरकार वकील आणि जलतज्ज्ञांची फौज उभा करत असेल, तर आम्ही देखील त्या विरोधात तशीच वकिलांची आणि जलतज्ञांची फौज उभा करू, असा इशारा दिला आहे. अलमट्टीमधील पाणी विसर्गाबाबत सध्या दोन्ही पातळ्यांवर चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. 

प्रकाश आबिटकर म्हणाले की, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला महाराष्ट्र सरकारचा विरोध असल्याचे केंद्राकडे स्पष्टपणे सांगितलं आहे. अलमट्टीमुळे सांगली आणि कोल्हापूरला सर्वाधिक फटका बसणार असल्याचे ते म्हणाले. धरणाची उंची वाढवण्यासाठी जर कर्नाटक सरकार अशा पद्धतीने वकील आणि जलतज्ज्ञांची फौज उभा करत असेल, तर आम्ही देखील त्या विरोधात तशीच वकिलांची आणि जलतज्ञांची फौज उभा करू असे ते म्हणाले. कायदेशीरदृष्ट्या जे जे करावे लागेल ते आम्ही करु, असे त्यांनी नमूद केले. 

महापुराचा फटका बसू नये याची काळजी घेत आहोत 

आबिटकर यांनी सांगितले की, या दरवर्षीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. पुढील आठ दिवसात कृषी विभाग आणि महापूर नियंत्रणा संदर्भात देखील बैठका होतील. महापूर रोखण्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्या केल्या जातील. महापूर येऊ नये यासाठी दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, कोल्हापूर आणि सांगलीचे आम्ही पालकमंत्री समन्वय ठेऊन काम करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. 

उंची वाढवण्यासाठी बैठक घेण्याचे केंद्राचे आश्वासन 

दरम्यान, अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याबाबत सर्व संबंधित राज्यांची 15 दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन केंद्र सरकारने कर्नाटकच्या शिष्टमंडळाला दिले आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या चारही राज्यांचा या धरणाची उंची वाढविण्याला विरोध असल्याने अलमट्टीचा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. अलमट्टीची उंची वाढविण्याला कृष्णा पाणी वाटप लवादाने परवानगी दिली आहे. त्यामुळे धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटरपर्यंत वाढविण्याबाबतची अधिसूचना जारी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
High Court On BMC: उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
Gashmeer Mahajani On Pravin Tarde: '100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
'100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
High Court On BMC: उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
Gashmeer Mahajani On Pravin Tarde: '100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
'100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
Kandivali Crime: गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, कांदिवलीतील एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
Beed Crime Vilas Ghule Case: बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
'द कपिल शर्मा शो'चं टॉप सीक्रेट अखेर सर्वांसमोर आलंच, 'बच्चा यादव'नं केला भांडाफोड; थेट कपिल शर्माचं नाव घेत म्हणाला...
'द कपिल शर्मा शो'चं टॉप सीक्रेट अखेर सर्वांसमोर आलंच, 'बच्चा यादव'नं केला भांडाफोड; थेट कपिल शर्माचं नाव घेत म्हणाला...
Nagpur Crime: आधी दारूच्या नशेत तरुणांसोबत राडा, नंतर नाकाबंदी दरम्यान पळून जाताना कारला धडकला; पोलिसांच्या तपासात तरुण नागपुरातील तडीपार आरोपी निघाला
आधी दारूच्या नशेत तरुणांसोबत राडा, नंतर नाकाबंदी दरम्यान पळून जाताना कारला धडकला; पोलिसांच्या तपासात 'तो' तरुण नागपुरातील तडीपार आरोपी निघाला
Embed widget