Chandrakant Patil : प्राचार्यांची 2072 पदे भरण्यासाठी अध्यादेश जारी, चंद्रकांत पाटील यांची माहिती
Chandrakant Patil : राज्यात रिक्त असलेल्या प्राचार्यांच्या एकूण 8 हजार पदांपैकी 2 हजार 72 पदे भरण्यास अध्यादेश जारी करण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
![Chandrakant Patil : प्राचार्यांची 2072 पदे भरण्यासाठी अध्यादेश जारी, चंद्रकांत पाटील यांची माहिती Ordinance issued to fill 2 thousand 72 posts of principals information of Minister Chandrakant Patil Chandrakant Patil : प्राचार्यांची 2072 पदे भरण्यासाठी अध्यादेश जारी, चंद्रकांत पाटील यांची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/a4b9e6f1861d67ae91578fd1c3d436d4166185475260088_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chandrakant Patil : राज्यात रिक्त असलेल्या प्राचार्यांच्या एकूण 8 हजार पदांपैकी 2 हजार 72 पदे भरण्यास अध्यादेश जारी करण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. उर्वरित पदांबाबत सविस्तर आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बारामती मिशनवरही माहिती दिली. ते म्हणाले की, बारामतीमध्ये प्रथम भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जातील आणि नंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जातील. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ बारामती नाही, तर 16 लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी सांगितले.
याच पद्धतीने याआधी सर्व मतदारसंघांवर उध्दवजींनी लक्ष केंद्रित केले असतं तर हे घडलं नसतं, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला. दरम्यान, त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरही भाष्य केले. ते केवळ राज ठाकरे यांना नाही, तर अनेक नेत्यांना भेटत असल्याचे सांगितले.
144 लोकसभा मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी भाजपच्या जागा निवडून आल्या नाहीत, पण त्याठिकाणी भाजप खासदार निवडून येऊ शकतात त्या जागांवर अधिक भर देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. 2024 मध्ये 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. राज्यातील 16 जागांवर लक्ष केंद्रित केलं आहे 16 जागांसाठी 16 मंत्री नेमल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)