एक्स्प्लोर

Kolhapur News : आम्ही अर्ध्या पगारावर काम करतो, पण जुनी पेन्शन थांबवा आणि महाराष्ट्र वाचवा; कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात धडक मोर्चा

जुनी पेन्शन थांबवा, महाराष्ट्र वाचवा! आम्ही तयार आहोत. अर्ध्या पगारावर काम करायला.. ते ही विना पेन्शन... सुशिक्षित बेरोजगारांचा युवक युवतींचा भव्य मोर्चा, अशा आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे.

Kolhapur News : सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी (old pension scheme) संप पुकारल्याने विरोधातील आणि समर्थनातील  प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियात सरकारी कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरल्याने संतप्त  प्रतिक्रिया उमटत आहेत. संपाची जाहीरपणे खिल्ली उडवली जात असल्याचेही दिसून येत आहे. मात्र, कोल्हापुरात (Kolahpur News) सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात सुशिक्षित बेरोजगारांमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची पोस्ट व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्टमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, पोलिसांकडे या मोर्चासाठी परवानगी मागण्यात आलेली नाही. 

काय म्हटले आहे व्हायरल पोस्टमध्ये?

जुनी पेन्शन थांबवा, महाराष्ट्र वाचवा! आम्ही तयार आहोत. अर्ध्या पगारावर काम करायला.. ते ही विना पेन्शन... सुशिक्षित बेरोजगारांचा युवक युवतींचा भव्य मोर्चा. जुनी पेन्शन योजना थांबवून महाराष्ट्र राज्याला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आपण सर्वजण मोर्चात सहभागी होऊया. उद्या (17 मार्च) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चासाठी दसरा चौकात हजर राहावे, असेही आवाहन यामधून करण्यात आले आहे. मी येतोय, तुम्हीही या.. यायला लागतंय असाही उल्लेख करण्यात आला आहे.

Kolhapur News : आम्ही अर्ध्या पगारावर काम करतो, पण जुनी पेन्शन थांबवा आणि महाराष्ट्र वाचवा; कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात धडक मोर्चा

कोल्हापूर मनपा कर्मचारी संपातून बाहेर

दरम्यान, राज्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा करुन तोडगा काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र राज्य महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनला दिलं आहे. त्यामुळे राज्यभरातील महापालिकेतील कर्मचारी आजपासून (16 मार्च) राज्यव्यापी संपातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे कोल्हापूर मनपा कर्मचारी (Kolhapur Municipal Corporation) आजपासून कामावर रुजू होणार आहेत. 

मात्र ते काळ्याफिती लावून काम सुरु करतील, असे पत्र फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत झिंजुर्डे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आहे. त्यामुळे आम्हीही कामावर रुजू होऊ, अशी माहिती कोल्हापूर महापालिका कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष विजय वणकुंद्रे, सरचिटणीस दिनकर आवळे, अजित तिवले यांनी दिली आहे.

कचरा उठावासाठी खासगी कर्मचारी 

दुसरीकडे, कोल्हापूर महापालिकेतील रोजंदारी कर्मचारी कामावर हजर झाले नसल्याने मनपा प्रशासनाकडून टिप्परसाठी, ड्रेनेज लाईनसाठी तसेच 81 प्रभागांत प्रत्येकी दोन याप्रमाणे 351 असे खासगी एजन्सीकडून कर्मचारी उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून कचरा उठावासह भागातील स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. सध्या मनपाकडे 200 रोजंदारी कर्मचारी आहेत. प्रशासनाने कर्मचारी संघाला ‘त्या’ कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याबाबतचे पत्र दिले होते, पण ते कामावर हजर झाले नसल्याने कचरा व सफाईचे काम दुसऱ्या दिवशीही ठप्प राहिले. त्यामुळे कंत्राटी चालकांकडून टिप्परमधून कचरा उठावाचा प्रयत्न झाला. तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्पावरही टिप्परमधून कचरा काढण्यासाठी 10 कंत्राटी कर्मचारी नेमले होते. रोजंदार कर्मचारी कामावर आले नसल्याने प्रशासनाने खासगी एजन्सीकडून कर्मचारी घेण्याचे नियोजन केले आहे. त्यात 169 टिप्परसोबत 169 सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Embed widget