(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay pawar on Sanjay Mandlik : उमेदवारीसाठी 10 फोन करत होता, आता प्रशासकीय यंत्रणा घेऊन निवडणूक लढा, संजय पवारांचा संजय मंडलिकांवर बोचरा वार
Sanjay pawar on Sanjay Mandlik : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी बंडखोरी केल्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा चांगलाच उद्रेक झाला आहे.
Sanjay pawar on Sanjay Mandlik : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी बंडखोरी केल्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा चांगलाच उद्रेक झाला आहे. काल शिवसेनेकडून बंडखोर धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढला होता.
दरम्यान, काल बंडखोरी केल्यानंतर संजय मंडलिक पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये प्रकट झाले. यावेळी बोलताना त्यांनी मुळ शिवसेनेमध्ये अ आणि ब असे दोन गट असल्याचे म्हटले होते. राज्यातील घटनेशी आमचा संबंध नसून लोकसभेतील गटनेता बदलला असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या भूमिकेवरून कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी संजय मंडलिक यांच्यावर पलटवार केला आहे.
संजय मंडलिक यांच्यासाठी सामान्य शिवसैनिकांनी काम केल्याचे सांगत त्यांचं हे वक्तव्य चुकीचं असल्याचे ते म्हणाले. लोकसभेसाठी उमेदवारी हवी होती तेव्हा संजय पवारला 10 फोन करत होता, मंडलिक यांनी आता प्रशासकीय यंत्रणेलाच घेऊन निवडणूक लढवावी असा पलटवार त्यांनी केला आहे. खासदार मंडलिक यांच्याही घरावर लवकरच जाऊन जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले.
शिवसैनिकच नाही, तर सामान्य लोक हळहळले
चांगल्या माणसाची कशी फसवणूक केली गेली हे पाहिलं गेल्याचे संजय पवार म्हणाले. गलिच्छ राजकारण यांनी केल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा शिवसैनिकांनी प्रार्थना केल्या होत्या. मात्र, ज्या पद्धतीने यांनी षड्यंत्र रचलं त्याचा राग ठाकरेंनी व्यक्त केल्याचे ते म्हणाले, आईचं दूध विकण्याचं पाप या लोकांनी केल्याचे ते म्हणाले.
भाजपचा डाव साध्य होईल तेव्हा मानसन्मान निघून जाईल तेव्हाच यांना शिवसेनेची आठवण येईल, असे संजय पवार म्हणाले. हे सुद्धा थोड्या वर्षात नाही तर थोड्या महिन्यातच संपतील, शिवसेना संपवणारे संपल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या