Kolhapur News : दहा महिने झाले तरी तुटलेल्या ऊसाला 100 रुपयांचा निर्णय नाहीच; स्वाभिमानी शेतकरी संघटना अमित शाहांना, राज्यपालांना काळे झेंडे दाखवणार
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सदरचा दुसरा हप्ता मान्यतेसाठी साखर आयुक्त यांचेमार्फत गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये मुख्य सचिवाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सन 2022-23 हंगामातील तुटलेल्या ऊसाला प्रतिटन 400 रुपये आंदोलन केले होते. यानंतर 100 रुपयांवर तोडगा काढण्यात आला होता. मात्र, 100 रुपये देण्याला मान्यता देण्यात आली असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर दौऱ्यावर येत असलेल्या केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह आणि राज्यपाल सी राधाकृष्णन यांच्या दौऱ्यात निदर्शने करून काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत.
निदर्शने करून काळे झेंडे दाखविण्यात येणार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 2022-23 या गळीत हंगामातील तुटलेल्या ऊसास प्रतिटन 400 रूपयाचा दुसरा हप्ता मिळावा याकरिता पुणे बंगळूर महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले होते. सदर आंदोलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने प्रतिटन 100 रूपयाचा तोडगा काढून आंदोलन स्थगित करण्यात आले होते. जवळपास 10 महिने झाले तरीही सरकारकडून सदर प्रस्तावांना मान्यता न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने 25 सप्टेंबर रोजी केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह व महाराष्ट्राचे राज्यपाल सी राधाकृष्णन यांच्या दौऱ्यात निदर्शने करून काळे झेंडे दाखविण्यात येणार आहेत.
Hasan Mushrif on Supriya Sule : सुप्रियाताईंनी XXX खोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला जायला नको होतं; हसन मुश्रीफांची समरजित घाटगेंवर नाव न घेता हल्लाबोल #kolhapur @mrhasanmushrif @supriya_sule @ghatge_raje https://t.co/8n9jgpViwe
— ABP माझा (@abpmajhatv) September 23, 2024
महापूर व महागाईमुळे शेतकरी मेटाकुठीस आला आहे. यामुळे मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांच्या अकार्यक्षमतेचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व राज्यपाल सी. राधाकृष्णन यांच्यासमोर निदर्शने करून काळे झेंडे दाखविण्यात येणार असल्याचे निवेदन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले आहे.
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापुरात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि शहर प्रमुखांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर #kolhapur @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm https://t.co/lC1vrdGPtX
— ABP माझा (@abpmajhatv) September 23, 2024
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सदरचा दुसरा हप्ता मान्यतेसाठी साखर आयुक्त यांचेमार्फत गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये मुख्य सचिवाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. जवळपास 10महिने झाले याबाबत मुख्य सचिव यांचेकडून याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. याबाबत जवळपास सहावेळा मुख्य सचिव व चारवेळा मुख्यमंत्री यांना याबाबत समक्ष भेटूनही कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या