(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Satej Patil : मुश्रीफ साहेब तुम्ही आम्ही टार्गेट आहे तसाच तो बिचारा त्या ठिकाणी टार्गेट होता! सतेज पाटलांची टोलेबाजी
डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य "सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन 2022 चे आज उद्घाटन करण्यात आले.
Satej Patil : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य "सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन 2022 चे आज उद्घाटन करण्यात आले. हे कृषी प्रदर्शन 23 ते 26 डिसेंबर दरम्यान तपोवन मैदानात होणार आहे.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कृषी प्रदर्शन आयोजनाचा उद्देश सांगितला. गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी उद् घाटनाला आल्याने राजकीय फटकेबाजी सुद्धा केली. सतेज पाटील म्हणाले की, कोविडमुळे कृषी प्रदर्शन आयोजित करताना अडचण आली आणि आता परत येतोय का अशी भीती निर्माण झाली आहे. कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना व्यासपीठ दिलं आहे. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. हातकणंगलेत अॅक्वा पोनिक नावाचं तंत्रज्ञान आलं आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हर्टिकल फार्मिंगची संकल्पना देशात आली आहे, नव्या तंत्रज्ञान सर्वच शेतकऱ्यांपर्यत पोहोचलं पाहिजे हा संकल्प राहिला आहे. शेतकऱ्यांनी चांगलं आहे ते घेऊन जावं आणि त्याचा प्रयोग करावा एवढीच आमची अपेक्षा आहे.
तसाच तो बिचारा त्या ठिकाणी टार्गेट
या प्रदर्शनातून चांगली माहिती मिळावी हा उद्देश आहे. ते पुढे म्हणाले की, मी जिग्नेश मेवाणी यांचे स्वागत करतो. याला लोकांनी पैसे एकत्र करून निवडून दिलं आहे. गुजरातमध्ये काय निकाल लागतो याकडे लक्ष नव्हतं, पण जिग्नेश मेवाणी ( satej patil on Jignesh Mevani) निवडून आला पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं होतं. हा तिशीतील शाहू फुले आंबेडकर विचाराने काम करणारा तरुण आहे. आमची मैत्री असल्याने निमंत्रण दिल्यानंतर उद्गघाटनासाठी आले. संघर्षमय नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गुजरातमध्ये फक्त 17 आमदार निवडून आले. मेवाणी निवडून येऊ नये म्हणून प्रचंड पैसा लावला गेला. मुश्रीफ साहेब तुम्ही आम्ही टार्गेट आहे तसाच तो बिचारा त्या ठिकाणी टार्गेट होता. मात्र, अश्रु पुसण्याचे जो काम करतो त्याला कोणी रोखू शकत नाही हे जिग्नेश मेवाणीच्या विजयाने दाखवून दिलं आहे. सर्वांत सोबत घेऊन जाणारे व्यक्तीमत्व उद्घाटनासाठी मिळालं.
दरम्यान, पाटील पुढे म्हणाले, कृषी क्षेत्रात नाविण्यपूर्ण प्रयोग करण्यात कोल्हापूरचा उल्लेख येतो. या ठिकाणी 100 टन ऊस काढणारा पाहिला आहे. दोन एकरपेक्षा कमी शेती असणारे 92 टक्के शेतकरी आहेत. त्यामध्येही विभागणी होत आहे. त्यामुळे त्याच शेतीमध्ये जास्त उत्पन कसे घेता येईल, पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे. पीक कर्जामध्ये राष्टीय बँकांपेक्षा जिल्हा बँकांचा मोठा वाटा आहे. शेतीतील उत्पन्न आणि दूधातून उत्पन्न यामधून शेतकऱ्यांची दिवाळी होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या