lumpy skin disease : पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या ऊसतोड मजुरांना पशुधनाचे लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार
lumpy skin disease : पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत येणाऱ्या ऊसतोड मजुरांना त्यांच्या मालकीच्या पशुधनाचे लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार आहे.
lumpy skin disease : पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत येणाऱ्या ऊसतोड मजुरांना त्यांच्या मालकीच्या पशुधनाचे लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये पशुधन आणण्याच्या 14 ते 21 दिवस आधी लसीकरण केले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात गळीत हंगामासाठी मराठवाडा आणि कर्नाटकातून लाखो ऊस मजुरांची आवक होते.
गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून तो चार महिने चालणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये रोगाचा झपाट्याने प्रसार झाला आहे. गायी आणि बैलांच्या मृत्यूची संख्या देखील जास्त आहे.
कोल्हापूरच्या पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त वाय.ए पठाण म्हणाले की, ज्या पशुधनाचे ऊसतोड मजुरांकडे लसीकरण प्रमाणपत्र नाही, त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, मजुरांकडे त्यांच्या पशुधनाचे लसीकरण प्रमाणपत्र असल्याची खात्री करण्यासाठी सरपंच आणि स्थानिकांची दक्षता समिती स्थापन करण्यात आल्याचे पठाण म्हणाले.
पठाण पुढे म्हणाले की, आम्ही संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांसोबत डेटा शेअर करत आहोत, जेणेकरून गायी आणि बैलांना लवकरात लवकर लसीकरण केले जाईल.
संक्रमित पशुधन निरोगी पशुधनाच्या संपर्कात आल्यास रोगाचा प्रसार होतो. पशुधनाला लम्पी रोगाची लागण झाल्यानंतर दोन आठवड्यांनी त्वचेवर गुठळ्या दिसू लागतात. जनावराला ताप येतो आणि वेळेवर उपचार न केल्यास मृत्यू होतो. जिल्हाधिकाऱ्यांकडून साखर कारखान्यांना निर्बंधाचे तपशील देण्यात आले आहेत. तसेच साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या