एक्स्प्लोर

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर झेडपी आणि पंचायत समितीमध्ये पुर्वीप्रमाणेच मतदारसंघ राहणार 

जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आघाडी सरकारने कमीत कमी 55 व जास्तीत जास्त 85 सदस्य संख्या करण्याचा निर्णय शिंदे सरकारने केराची टोपली दाखवली आहे. 2017 मध्ये जी मतदारसंघांची रचना होती, ती कायम राहणार आहे.

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय त्याच सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे सरकारकडून निर्णय बदलण्याचा सपाटा सुरुच आहे. आता यामध्ये झेडपी आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम अंतिम टप्प्यात असताना पुन्हा एकदा निर्णय रद्द झाला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आघाडी सरकारने कमीत कमी 55 व जास्तीत जास्त 85 सदस्य संख्या करण्याचा निर्णय शिंदे सरकारने केराची टोपली दाखवली आहे. 2017 मध्ये जी मतदारसंघांची रचना होती, ती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने वाढविलेली सदस्य संख्या कमी होणार आहे.  

आता एकनाथ शिंदे सरकारकडून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची मतदारसंघ नवीन रचना रद्द केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे पूर्वीप्रमाणे 67, तर पंचायत समित्यांचे 134 मतदारसंघ राहतील. यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची सर्व प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवावी लागणार आहे. 

जिल्हा परिषद सदस्यांची संख्या पूर्वी कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 अशी निश्चित केली होती. त्यानुसार छोट्या जिल्ह्यात सदस्यांची संख्या 50 होती, तर मोठा जिल्हा कितीही असला तरी 75 पेक्षा सदस्यांपेक्षा अधिक करता येत नव्हती. त्यामुळे लोकसंख्या आणि मतदानामध्ये वाढ झाल्याने महाविकास आघाडी सरकारने झेडपी सदस्य संख्येत कमीत कमी 55 आणि जास्तीत जास्त 85 अशी सदस्य संख्या केली होती. या निर्णयानंतर कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 9 ने वाढवून 76 झाली होती.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून मतदारसंघांची पुनर्रचना केल्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे 76 मतदारसंघ, तर पंचायत समित्यांचे 152 मतदारसंघ निश्चित करण्यात आले. त्याचबरोबर आरक्षण प्रक्रियाही राबवण्यात आली होती. त्यामुळे लढतींचे  चित्र स्पष्ट झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला होता. 

नव्या निर्णयानुसार जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 75 होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करण्याचे नव्या शासनाने ठरविले आहे. यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघाची संख्या पूर्वीइतकीच राहणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आलिशान कार, लक्झरी व्होल्वो बसेस, आलिशान बंगल्याचा मालक; आदल्या दिवशी संपत्ती जप्त अन् दुसऱ्याच दिवशी भीषण अपघातात अंत; अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमूदाय
आलिशान कार, लक्झरी व्होल्वो बसेस, आलिशान बंगल्याचा मालक; आदल्या दिवशी संपत्ती जप्त अन् दुसऱ्याच दिवशी भीषण अपघातात अंत; अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमूदाय
Solapur Crime: सोलापूरमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची बदली झाली, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं
सोलापूरच्या बार्शीत पोलीस कॉन्स्टेबलचं धक्कादायक पाऊल, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं
लग्नात बिबट्या घुसला अन् वधू वरानं धूम ठोकली; कॅमेरामन झाला 'स्पायडरमॅन'; पंगतीमधील लोकं ताट सोडून दिसेल त्या मार्गाने फरार
लग्नात बिबट्या घुसला अन् वधू वरानं धूम ठोकली; कॅमेरामन झाला 'स्पायडरमॅन'; पंगतीमधील लोकं ताट सोडून दिसेल त्या मार्गाने फरार
साहित्य महामंडळाला अंधारात ठेवून एकनाथ शिंदेंच्या सत्काराचा कार्यक्रम, नियम धाब्यावर बसवले? आयोजक संजय नहार म्हणाले...
साहित्य महामंडळाला अंधारात ठेवून एकनाथ शिंदेंच्या सत्काराचा कार्यक्रम, नियम धाब्यावर बसवले? आयोजक संजय नहार म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 13 February 2025Rajan Salvi On Eknath Shinde : शिवसेनाप्रवेशापूर्वी ठाण्यात भेट,शिंदेंनी साळवींना काय आश्वासन दिलं?ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 13 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सUday Samant On Rajan Salvi : राजन साळवींना कोणती जबाबदारी? उदय सामंतांनी सगळं सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आलिशान कार, लक्झरी व्होल्वो बसेस, आलिशान बंगल्याचा मालक; आदल्या दिवशी संपत्ती जप्त अन् दुसऱ्याच दिवशी भीषण अपघातात अंत; अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमूदाय
आलिशान कार, लक्झरी व्होल्वो बसेस, आलिशान बंगल्याचा मालक; आदल्या दिवशी संपत्ती जप्त अन् दुसऱ्याच दिवशी भीषण अपघातात अंत; अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमूदाय
Solapur Crime: सोलापूरमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची बदली झाली, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं
सोलापूरच्या बार्शीत पोलीस कॉन्स्टेबलचं धक्कादायक पाऊल, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं
लग्नात बिबट्या घुसला अन् वधू वरानं धूम ठोकली; कॅमेरामन झाला 'स्पायडरमॅन'; पंगतीमधील लोकं ताट सोडून दिसेल त्या मार्गाने फरार
लग्नात बिबट्या घुसला अन् वधू वरानं धूम ठोकली; कॅमेरामन झाला 'स्पायडरमॅन'; पंगतीमधील लोकं ताट सोडून दिसेल त्या मार्गाने फरार
साहित्य महामंडळाला अंधारात ठेवून एकनाथ शिंदेंच्या सत्काराचा कार्यक्रम, नियम धाब्यावर बसवले? आयोजक संजय नहार म्हणाले...
साहित्य महामंडळाला अंधारात ठेवून एकनाथ शिंदेंच्या सत्काराचा कार्यक्रम, नियम धाब्यावर बसवले? आयोजक संजय नहार म्हणाले...
Prabhakar Karekar Passed Away: नाट्यसंगीतातला दिग्गज हरपला! जेष्ठ शास्त्रीय गायक पं प्रभाकर कारेकर यांचं निधन
नाट्यसंगीतातला दिग्गज हरपला! जेष्ठ शास्त्रीय गायक पं प्रभाकर कारेकर यांचं निधन
IPO Update :हेक्सावेअर टेक्नोलॉजीजचा  8750 कोटींचा आयपीओ येणार, किंमतपट्टा किती? GMP कितीवर पोहोचला?
हेक्सावेअर टेक्नोलॉजीजचा 8750 कोटींचा आयपीओ येणार, किंमतपट्टा किती? GMP कितीवर पोहोचला?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना मोठा धक्का! नाशिकमधील बड्या नेत्यांचा मनसे, ठाकरे गटाला 'रामराम'
एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना मोठा धक्का! नाशिकमधील बड्या नेत्यांचा मनसे, ठाकरे गटाला 'रामराम'
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शिखर धवनची एन्ट्री! ICC ची मोठी घोषणा, सोपवली महत्त्वाची जबाबदारी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शिखर धवनची एन्ट्री! ICC ची मोठी घोषणा, सोपवली महत्त्वाची जबाबदारी
Embed widget