Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापुरात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि शहर प्रमुखांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
kolhapur uttar vidhan sabha : रविकिरण इंगवले आणि संजय पवार हे दोघेही कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. दोघांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या (kolhapur uttar vidhan sabha) जागेवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच आता शिवसेना ठाकरे गटांमधील अंतर्गत वाद सुद्धा समोर आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार आणि शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यात कोल्हापूर उत्तरमधील उमेदवारीवरून धुसफूस सुरू आहे. त्यामुळे या दोघांमधील वात चव्हाट्यावर आला आहे. रविकिरण इंगवले आणि संजय पवार हे दोघेही कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. दोघांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र या दोघांमध्ये मेळाव्यावरून ठिणगी पडली आहे.
... तर महाराष्ट्रातल्या जनतेला कुत्र्याचं मटन खावं लागेल; कोल्हापुरातून पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्यhttps://t.co/b5X1t9FRsu
— ABP माझा (@abpmajhatv) September 23, 2024
रविकरण इंगवले यांचा कॉल व्हायरल
शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यामध्ये नाव नसल्याने शहरप्रमुख रविकरण इंगवले यांनी नाराजी व्यक्त केली. इंगवले यांनी संजय पवार यांच्यावर चुकीचे वर्तन केल्याचा आरोप केला आहे. पक्ष अडचणीत असताना एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असं असताना सुद्धा संजय पवार हे चुकीचं वर्तन करत असल्याचे रवीकरण यांनी म्हटलं आहे. रविकिरण इंगवले यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे म्हटलं आहे. रविकरण इंगवले यांचा या संदर्भातील कॉल व्हायरल झाल्याने या दोन्ही नेत्यांमधील वाद समोर आला आहे.
कोल्हापूर उत्तरची जागा कोणाकडे जाणार?
कोल्हापूर उत्तरची जागा कोणाकडे जाणार? याबाबत अजूनही साशंकता कायम आहे. या मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक पार पडली होती. पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी विजय मिळवला होता. 2019 मध्ये आमदार चंद्रकांत जाधव यांनी या मतदारसंघातून काँग्रेसकडून विजय मिळवला होता. मात्र त्यांच्या निधनानंतर जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु असतानाच या जागेवर भाजपकडून सुद्धा दावा आहे. कोल्हापूर उत्तर ही शिवसेनेची जागा आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून राजेश क्षीरसागर यांनी तयारी सुरु केली आहे.
त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सुद्धा ही जागा नेमकी कोणाच्या वाटेला जाणार? याबाबत अजूनही अंदाज लावले जात आहेत. भाजपकडून सत्यजित कदम आणि खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक इच्छुक आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या