![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News : कोल्हापुरात पाच मार्चला 'रन फॉर हेल्थ, रन फॉर मिलेट'चे आयोजन; आहारात तृणधान्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी उपक्रम
पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व घराघरांत पोहोचवणे गरजेचे आहे. 5 मार्च रोजी रन फॉर हेल्थ रन फॉर मिलेट (पौष्टिक तृणधान्य जनजागृती दौड) आयोजित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी केल्या.
![Kolhapur News : कोल्हापुरात पाच मार्चला 'रन फॉर हेल्थ, रन फॉर मिलेट'चे आयोजन; आहारात तृणधान्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी उपक्रम Kolhapur Run for Health Run for Millet on March 5 in Maharashtra Kolhapur marathi news Kolhapur News : कोल्हापुरात पाच मार्चला 'रन फॉर हेल्थ, रन फॉर मिलेट'चे आयोजन; आहारात तृणधान्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी उपक्रम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/15/d49c60980026249fdd4bdd6c1ce95a931676432844517444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kolhapur News : कोल्हापुरात (Kolhapur News) पाच मार्चला 'रन फॉर हेल्थ, रन फॉर मिलेट'चे आयोजन येणार आहे. आहारात तृणधान्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी हा उपक्रम घेण्यात येणार आहे. चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व घराघरांत पोहोचवणे गरजेचे आहे, यासाठी जिल्ह्यात वर्षभर विविध उपक्रम राबवावेत, 5 मार्च रोजी रन फॉर हेल्थ रन फॉर मिलेट (पौष्टिक तृणधान्य जनजागृती दौड) आयोजित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हा कार्यकारी समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, पणन विभागाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, जिल्हा माता, बाल संगोपन अधिकारी डॉ. वंदना जोशी, तसेच समिती सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय आवारात विविध तृणधान्ये आणि त्यापासून बनवण्यात आलेल्या पदार्थांच्या स्टॉलला जिल्हाधिकारी रेखावार आणि समिती सदस्यांनी भेट दिली. तृणधान्यापासून तयार केलेल्या पदार्थांच्या स्टॉलला भरघोस प्रतिसाद मिळाला, प्रत्येक स्टॉलवरील पदार्थांची अल्पावधीतच विक्री झाल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हाधिकारी म्हणाले की, पौष्टिक तृणधान्यांचे आहारात खूप महत्व आहे. सर्व शासकीय कार्यालये, शासकीय दवाखान्यांमधील दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करा. प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, वसतिगृहांत देखील या आहाराचा समावेश करता येईल का? याबाबत विचार करावा. नागरिकांनी आहारात तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे प्रमाण वाढवण्यासाठी कृषी विभाग आणि अन्य विभागांनी मिळून विविध उपक्रम राबवावेत. याबाबत व्यापक जनजागृतीसाठी बाईक रॅली, पाककला स्पर्धा, तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने आदी उपक्रमही राबवावेत. यात महिला बचत गटांचा सहभाग घ्यावा.
तृणधान्यांचे महत्त्व शालेय जीवनातच समजण्यासाठी माहिती पुस्तिका तयार करुन यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करा. यात विद्यार्थ्यांसह पालकांना सहभागी करुन घ्या, जेणेकरुन तृणधान्यांचे महत्व घराघरांत पोहोचेल. तृणधान्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच आहारातील वापर वाढण्यासाठी सर्व विभागांनी मिळून प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष जाहीर झाले असून यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी दिली.
महत्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)