Kolhapur Puikhadi Accident : आई, अर्ध्या तासात जेवून येत आहे म्हणाला, पण घरी मृतदेहच आला
अपघात (Kolhapur Puikhadi Accident) इतका भीषण होता, की भरधाव कार दगडाला धडकल्यानंतर हवेत उडाली. कारमध्ये असणारे यावेळी शुभम हेमंत सोनार आणि शंतनू कुलकर्णी कारमधून बाहेर फेकले गेले.
kolhapur puikhadi accident : कोल्हापूर शहराजवळील पुईखडी घाटात भरधाव कार दगडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा करुण अंत झाला. मृत झालेल्या तरुणांची नावे शुभम हेमंत सोनार (वय 24, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) आणि शंतनू शिरीष कुलकर्णी (वय 28, मोरेवाडी, ता. करवीर जि. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.
हा अपघात इतका भीषण होता, की भरधाव कार दगडाला धडकल्यानंतर हवेत उडाली. कारमध्ये असणारे यावेळी शुभम हेमंत सोनार आणि शंतून कुलकर्णी कारमधून बाहेर फेकले गेले. यावेळी हवेतून कार शंतूनच्या अंगावर आदळल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला, तर शुभमचा मृत्यू दगडावर डोके आपटून झाला. दरम्यान, या अपघातात सौरभ रवींद्र कणसे (वय 26, राजारामपुरी सहावी गल्ली, कोल्हापूर) संकेत बाळकृष्ण कडणे ( वय 21, गावभाग सांगली) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
पार्टी संपवून घरी येत असताना काळाचा घाला
वाशी (ता. करवीर) येथून एका फार्महाऊसवर पार्टी संपवून घरी येत असताना शनिवारी मध्यरात्री १ च्या सुमारास अपघात झाला. शुभम, शंतनू , संकेत आणि सौरभ वाशीमधील फार्महाऊस पार्टी करून परत येत होते. त्यांची कार समोरून येणाऱ्या डंपरची हेडलाईट डोळ्यावर आल्याने कार चालवत असलेल्या शुभमचा कारवरील ताबा सुटून दगडाला जाऊन धडकल्यानंतर घाटात जाऊन घाटात कोसळली. यामध्ये शुभम आणि संकेत यांचा जागीच मृत्यू झाला, संकेत आणि सौरभ जखमी झाले.
शंतनूला आईने केलेला फोन शेवटचा ठरला
पार्टी गेलेल्या शंतनूला वेळ झाल्यानंतर शंतनूच्या आईने कोठे आहे पाहण्यासाठी फोन केला होता. त्यावेळी फोनवरून शंतनूने आईला अर्ध्या तासात येत आहे असा निरोप दिला, पण काही वेळानंतर थेट मृतदेह घरी आल्याने आईने केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
अपघातात कार 30 फुट खोल दरीत कोसळली
अपघातात मृत्यू झालेल्या शुभमचा वाशीमध्ये फार्महाऊस आहे. त्या ठिकाणी या चौघा मित्रांचा पार्टीचा बेत ठरला होता. पार्टी करून परत येत असतानाच पुईखडीच्या उताराला कार 30 फुट खोल कोसळली गेली. कार हवेत उडून कोसळल्यानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्त कारजवळ धाव घेत मदतकार्य सुरु केले. जखमींना कारच्या काचा फोडून सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
इतर महत्त्वाच्या बातम्या