Kolhapur Crime : सराईत गुन्हेगारासह अल्पवयीन ताब्यात, घरफोडीचे सात गुन्हे उघडकीस; सव्वा लाखांवर मुद्देमाल जप्त
कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं परजिल्ह्यातील सराईत आणि त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेत सात घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत. त्यांच्याकडून 1 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Kolhapur Crime : कोल्हापूर पोलिसांच्या (Kolhapur Police) स्थानिक गुन्हे शाखेनं परजिल्ह्यातील सराईत गुन्हेगार आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेत सात घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत. त्यांच्याकडून 1 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निकाजी काळे (रा. आष्टी, जि. बीड) असे त्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेला सराईत गुन्हेगार निकाजी काळे हा अल्पवयीन साथीदार मोहन निकल भोसले (वय 17) होंडा शाईन मोटरसायकलवरून (एमएच-23-एव्ही- 2725) काखे फाट्यावर (कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून वरील तपास पथकाने निकाजी व अल्पवयीन मोहनला सापळा रचून पकडण्यात आले.
सात घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस
त्यांच्याकड चोरीस गेलेली सोन्याची बोरमाळ, इतर सोन्या-चांदीचे दागिने व शाईन मोटर सायकल असा एकूण 1 लाख 30 हजारांचा मुद्देमाल मिळून आला. चोरीच्या मुद्देमालावरून त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्यासह पन्हाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत 1 व शाहुवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 5 गुन्हे असे एकूण 7 घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने चोरलेल्या दागिन्यांपैकी आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले, पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलिस अंमलदार वसंत पिंगळे, हिंदुराव केसरे, संजय हुंबे, प्रशांत कांबळे, रणजित कांबळे, असिफ कलायगार, संजय पडवळ, संतोष पाटील, अनिल जाधव, राजेंद्र वरंडेकर आणि सायबर पोलिस ठाणे कडील सुहास पाटील, रविंद्र पाटील व विनायक बाबर यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या