एक्स्प्लोर

Kolhapur News : गर्भवती महिलेवर उपचारासाठी जाताना आरोग्यसेविका एसटीखाली सापडून ठार; 15 दिवसांपूर्वीच केला होता नव्या घरात प्रवेश

स्वरुपा शिंदे या करंजफेण (ता.शाहुवाडी) अंतर्गत येणाऱ्या नांदगाव आरोग्य उपकेंद्रात कार्यरत होत्या. शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करंजफेणमध्ये आरोग्य सेवक हैबती मगदूम यांच्या सोबत जात होत्या.

शाहूवाडी (कोल्हापूर) : आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या गर्भवती महिलेवर उपचार करण्यासाठी जात असताना आरोग्यसेविका एसटीखाली सापडून ठार झाल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) शाहूवाडी तालुक्यातील करंजफेणजवळ घडली.  स्वरूपा विजय शिदें (वय 30, रा. नणुंद्रे ता.पन्हाळा, जि. कोल्हापूर ) असे त्यांचे नाव आहे. स्वरुपा शिंदे या करंजफेण (ता.शाहुवाडी) अंतर्गत येणाऱ्या नांदगाव आरोग्य उपकेंद्रात कार्यरत होत्या. शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करंजफेणमध्ये सावर्डेमधील सोनाली सुरेश कांबळेच्या प्रसुतीसाठी पुनाळमधील आरोग्य सेवक हैबती मगदूम यांच्या सोबत जात होत्या.  

डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू

यावेळी करंजफेण गावाजवळ करंजफेणहून नांदगाव- कोतोली मार्गे एसटी कोल्हापूरला जात होती. यावेळी समोरुन एसटी आल्याने दुचाकी बाजूला घेत असताना रस्त्याची साईटपटी खचली असल्याने पुढील चाक घसरले. त्यामुळे दुचाकीवरून तोल गेल्याने हैबती मगदूम व स्वरुपा शिंदें खाली कोसळल्या. यावेळी स्वरुपा शिंदे एसटीच्या मागील चाकाखाली सापडल्या. यावेळी डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जखमी हैबती मगदुम यांना उपचारासाठी मलकापूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. एसटी चालक सागर पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

दोन महिन्यांपूर्वीच नव्या घरात 

स्वरुपा शिंदे यांच्या नव्या घराची वास्तूशांती झाली आहे. अवघ्या 15 दिवसांपूर्वी त्या नव्या घरात राहण्यासाठी गेल्या होत्या.   शिंदे यांच्या पश्चात मुलगा असून तो चौथीत आहे, तर मुलगी अंगणवाडीत शिकत आहे. त्यांचे पती विजय शिंदे प्राथमिक शिक्षक आहेत.गौरी गणपतीच्या सणात घडलेल्या अपघाताने नणुंद्रे गावावर शोककळा पसरली आहे.

अखेर गव्याच्या हल्ल्यातील जखमीचे निधन

दरम्यान, गडहिंग्लज-आजरा मार्गावर दोन दिवसांपूर्वी हॉटेल बिग बॉससमोर मुंगूसवाडीकडून हाजगोळीच्या दिशेने जाणाऱ्या गव्याने आजऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलला जोराची धडक दिली होती. या धडकेत मोटरसायकलवरील उस्मान कानडीकर (वय 65) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. रहमान लमतुरे (वय 45 रा. आजरा) जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी गडहिंग्लजमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी कानडीकर यांचे उपचारदरम्यान निधन झाले.

उस्मान कानडीकर आणि रहमान लमतुरे दोघेही दुचाकीने गडहिंग्लजला गेले होते. बुधवारी सायंकाळी ते आजऱ्याकडे परतत होते. अण्णा भाऊ आजरा सूतगिरणीजवळ एक गवा अचानक समोर येऊन त्यांच्या मोटारसायकलला धडकला. त्यामुळे दोघेही मोटारसायकलसह रस्त्यावर पडल्याने ते जखमी झाले. कानडीकर यांना जबर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget