डॉक्टर बनले देवदूत! हृदयविकाराचा झटका आलेल्या रूग्णाचे असे वाचवले प्राण, पाहा VIDEO
kolhapur News Update : डॉक्टरांसोबत बोलत असतानाच अचानक रूग्णाला हार्ट अटॅक आला. मात्र, डॉक्टरांनी सतर्कता दाखवत उपचार केले. त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचले.
kolhapur News Update : रूग्णांसाठी डॉक्टर ईश्वर असतात असे म्हटले जाते. याचाच प्रत्येय कोल्हापूरमध्ये आलाय. डॉक्टरांसमोरच बसलेल्या रूग्णाला हार्ट अटॅक आला. परंतु, प्रसंगावधान राखून डॉक्टरांनी या रूग्णाचे प्राण वाचवले आहेत. रूग्णालयातील सीसीटीव्हीमध्ये या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ कैद झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून रूग्णाचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक केले जात आहे. हृदयरोग तज्ञ अर्जुन अडनाईक यांनी ही तत्परता दाखवल्यामुळे रूग्णाचे प्राण वाचले आहेत.
अर्जुन अडनाईक यांच्याकडे एक रूग्ण गेला होता. हा रूग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. यावेळी आणखी दोन व्यक्ती त्या रूग्णासोबत होत्या. डॉक्टरांसोबत बोलत असतानाच अचानक संबंधित रूग्णाला हार्ट अटॅक आला. मात्र, डॉक्टरांनी सतर्कता दाखवत उपचार केले. त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचले. कोल्हापुरातील हृदयरोग तज्ञ डॉ. अर्जुन अडनाईक यांच्या रुग्णालयात हा संपूर्ण प्रकार घडला आहे. अडनाईक यांच्या रूग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रुग्ण डॉक्टरांच्या समोरच खुर्चीत बसून चर्चा होता. यावेळी अचानक त्यांना अॅटक आला. त्यामुळे बोलता बोलता त्यांची मान मागे पडली आणि खुर्चीतच ते शांत झाले. परंतु, समोरच भसेल्या डॉ. अडनाईक यांच्या हा प्रकार लक्षात आला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी रूग्णावर प्राथमिक उपचार केले आणि त्याचे प्राण वाचवले. प्रसंगावधान राखत डॉक्टरांनी रूग्णाच्या छातीवर हाताने हलकेसे ठोके देत त्याचा जीव वाचवला.
View this post on Instagram
लोकांनी व्हिडीओ शेअर करत डॉक्टरांना देवदूत म्हटले आहे. नीट लक्ष देऊन व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येते की, बोलता बोलता रूग्ण अस्वस्त वाटू लागल्यामुळे खुर्चीतच पडून राहिले. यावेळी तत्काळ डॉक्टरांनी त्याच्या छातीवर हालकेसे ठोके दिले. काही वेळातच रूग्ण व्यवस्थित बोलू लागला. काही वेळातच हा संपूर्ण प्रकार घडला. परंतु, प्रत्यक्षात डॉक्टर समोरच रूग्णाला अॅटक येणे आणि तत्परता दाखवत डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवणे ही घटना सध्या कोल्हापुरात चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावरून डॉक्टरांचे आभार मानत त्यांचे कौतुक केले जात आहे.