Radhanagari Waterfall : तर तीन वर्षांचा कारावास अन् 25 हजारांचा दंड! राधानगरी तालुक्यात कोणकोणत्या धबधब्यावर बंदी?
वर्षा पर्यटनाच्या सुरुवातीलाच राधानगरी अभयारण्य वन्यजीव विभागाकडून सूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे धबधब्याच्या मार्गावरच प्रवेशबंदीचा फलक लावण्यात आला आहे.

कोल्हापूर : नयनरम्य निसर्गाने नटलेल्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामध्ये (Radhanagari) वर्षा पर्यटनासाठी गेल्या काही वर्षांपासून दिवसांपासून मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे तालुक्यातील ओसंडून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी मोदी गर्दी होत आहे. मात्र, या गर्दीला भान राहत नसल्याने जीवितहानीच्या सुद्धा घटना होत आहेत.
तोरस्करवाडी धबधबा परिसरात गेल्यास तीन वर्षांचा कारावास
या सर्व पार्श्वभूमीवर आता वर्षा पर्यटनाच्या सुरुवातीलाच राधानगरी अभयारण्य वन्यजीव विभागाकडून सूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे धबधब्याच्या मार्गावरच प्रवेशबंदीचा फलक लावण्यात आला आहे. तोरस्करवाडी धबधबा परिसरात गेल्यास तीन वर्षांचा कारावास आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा असणार आहे. मार्गावर वन्यजीव विभागाकडून फलकच लावण्यात आला आहे. त्यामुळे या धबधब्यावर पर्यटकांना बंदी असणार आहे. राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा सोडून इतर ठिकाणी जाण्यासाठी जीवावर बेतण्यासारखं आहे. त्यामुळेच बंदी घालण्यात आली आहे. गेल्यावर्षी तोरस्करवाडी धबधब्यात गारगोटीतील एका युवकाला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे वन्यजीव विभागाने यंदा वेळीच पाऊल उचलत कारवाईची आठवण करून दिली आहे.
17 जूनपर्यंत राधानगरी धरणामध्ये दोन टीएमसी पाणी
दुसरीकडे, राधानगरी धरण क्षेत्रामध्ये जून महिन्यामध्ये आतापर्यंत 177 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये पावसाने पूर्णत: दडी मारली होती. यंदा जून महिन्यामध्ये झालेल्या पावसाने गेल्या वर्षी तुलनेमध्ये अधिकचा पाणी शिल्लक आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 17 जूनपर्यंत राधानगरी धरणामध्ये दोन टीएमसी पाणी असून जवळपास 23.96 टक्के पाणीसाठा झाला आहे.
आंबोली घाटात अस्वच्छता करणाऱ्यांना दणका
दरम्यान, आंबोली घाटात अस्वच्छता करणाऱ्यांना सावंतवाडी वनविभागाने दणका दिला आहे. 13 जणांवर दंडात्मक कारवाई करून 12 हजारांच्या घरात दंड वसूल करण्यात आला आहे. घाटात अस्वच्छता, माकडांना खाऊ घालणे, धूम्रपान करणे, अशा निसर्ग व पर्यटनास घातक ठरणाऱ्या कृत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वन विभागाकडून सर्वच ठिकाणी आंबोली घाटात फलक लावण्यात आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
