Kolhapur News: कोल्हापुरातील मधाचं गाव पाटगावची देशभरात चर्चा , पर्यटनांच्या यादीत नोंद
कोकणाच्या वेशीवर वसलेलं शिवकाळात प्रचंड महत्व असलेलं पाटगाव आता मधाचं गाव पाटगाव बनलं आहे. पूर्वीपासूनच या गावात मध निर्मिती केली जायची.

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या कुशीमध्ये एक गाव लपलं आहे. जे गाव आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे. कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील मधाचे (Honey) गाव पाटगाव (Kolhapur Patgaon) या गावाची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण केंद्र सरकारने मध आणि पर्यटनाच्या यादीतील महत्वाचे गाव म्हणून घोषीत केले आहे.
कोकणाच्या वेशीवर वसलेलं शिवकाळात प्रचंड महत्व असलेलं पाटगाव आता मधाचं गाव पाटगाव बनलं आहे. पूर्वीपासूनच या गावात मध निर्मिती केली जायची. भात शेती वगळता उत्पादनाची कोणतीच साधनं नसल्याने मध उत्पादन केलं जायचं. पण मध्यंतरी मानवी हस्तक्षेप आणि निसर्ग बदलामुळे इथली मध निर्मिती जवळपास संपुष्टात आली. पण आता या गावानं पुन्हा कात टाकली आहे आणि त्याला प्रशासनाने देखील हातभार लावलाय. जिल्हा प्रशासन आणि स्थानिकांच्या सलग दोन वर्षांच्या प्रयत्नाला यश आलंय. म्हणूनच मधाचं गाव पाटगावला केंद्र सरकारने मध आणि पर्यटनाच्या यादीतील महत्वाचे गाव म्हणून घोषीत केले आहे.
वर्षभरात जवळपास दहा टन मध निर्मिती
या गावांमध्ये आधी पारंपारिक पद्धतीने मध गोळा केला जायचा मात्र आता त्याला आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. तरुण वर्ग मोठ्या संख्येने या व्यवसायाकडे उतरला आहे. या एका गावामध्ये वर्षभरात जवळपास दहा टन मध निर्मिती केली जाते. देशातील हे एकमेव ठिकाण आहे.
पाटगावमध्ये मोठ्या प्रमाणात मध निर्मिती
आपण बाजारामध्ये मध घेण्यासाठी गेल्यानंतर भेसळ असेल का? अशी शंका आपल्या मनात येत असते. ही शंका योग्यच आहे, कारण अलीकडे मधमध्ये भेसळीचे प्रमाण जास्त वाढले आहे त्याचा फटका शुद्ध मध निर्मिती करणाऱ्या उत्पादकांना बसत असतो. मात्र भेसळ असलेला मध आणि शुद्ध मध कसा ओळखायचा ते देखील सांगितले जाते. पाटगावमध्ये मध निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, मात्र त्याला अजूनही पारंपारिक मार्केट आहे. ज्यांना तिथल्या मधाची गोडी माहिती आहे. तेच या ठिकाणी येऊन मध घेतात. मात्र आता याला व्यापक रूप दिले जाणार आहे. त्यामुळे मधपाळ देखील आनंदात आहेत..
मधाचे वेगवेगळे प्रकार
मधाचं गाव पाटगाव या ठिकाणी अनेक प्रकारचे मध मिळतात. औषधी वनस्पती कारवीवरील मध तर सात वर्षांनी एकदा मिळतो. त्याचबरोबर सूर्यफुलावरचा मध, जांभूळ मध असे मधाचे अनेक प्रकार पाटगावात पाहायला मिळतात.
हे ही वाचा :
नंदुरबारमधील इंजिनिअरचा भन्नाट प्रयोग; चक्क 15 बाय 15 च्या खोलीत घेतले दर्जेदार केशरचे उत्पादन, पंचक्रोशीत चर्चा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
