एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत किती लाख अर्जांना मंजूरी? कोणत्या तालुक्यातून सर्वाधिक अर्ज??

लाडकी बहिण योजनेसाठी आत्तापर्यंत जिल्ह्यात 6 लाख 95 हजार 964 अर्ज प्राप्त झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यातून सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत एकुण 6 लाख 86 हजार 569 इतके अर्ज ऑनलाईन मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. लाडकी बहिण योजनेसाठी आत्तापर्यंत जिल्ह्यात 6 लाख 95 हजार 964 अर्ज प्राप्त झाले होते. जिल्ह्यात कागल तालुक्यातून सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. 

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला मिळणार आहे. विशेष म्हणजे 17 ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरित केले जाणार आहेत. आजच्या (7 ऑगस्ट) मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील. 17 ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार आहे. त्यामुळे पात्र झालेल्या महिला भगिनींना दिलासा मिळाला आहे. 

जिल्ह्यात तालुकानिहाय मंजूर अर्जांची संख्या 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तालुकानिहाय मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार कागल तालुक्यातील ऑनलाईन प्राप्त अर्जांची संख्या 59 हजार 370 असून ऑनलाईन मंजूरी देण्यात आलेल्या अर्जांची संख्या 59 हजार 359 इतकी आहे.

चंदगड तालुक्यातील ऑनलाईन प्राप्त अर्जांची संख्या 37 हजार 271 असून ऑनलाईन मंजूरी देण्यात आलेल्या अर्जांची संख्या 37 हजार 258 इतकी आहे.

शिरोळ तालुक्यातील ऑनलाईन प्राप्त अर्जांची संख्या 75 हजार 495 असून ऑनलाईन मंजूरी देण्यात आलेल्या अर्जांची संख्या 75 हजार 234 इतकी आहे.

शाहूवाडी तालुक्यातील ऑनलाईन प्राप्त अर्जांची संख्या 34 हजार 885 असून ऑनलाईन मंजूरी देण्यात आलेल्या अर्जांची संख्या 34 हजार 753 इतकी आहे.

आजरा तालुक्यातील ऑनलाईन प्राप्त अर्जांची संख्या 23 हजार 852 असून ऑनलाईन मंजूरी देण्यात आलेल्या अर्जांची संख्या 23 हजार 731 इतकी आहे.

हातकणंगले तालुक्यातील ऑनलाईन प्राप्त अर्जांची संख्या  1 लाख 38 हजार 028 असून ऑनलाईन मंजूरी देण्यात आलेल्या अर्जांची संख्या 1 लाख 35 हजार 255 इतकी आहे.

राधानगरी तालुक्यातील ऑनलाईन प्राप्त अर्जांची संख्या 39 हजार 804 असून ऑनलाईन मंजूरी देण्यात आलेल्या अर्जांची संख्या 39 हजार 186 इतकी आहे.

पन्हाळा तालुक्यातील ऑनलाईन प्राप्त अर्जांची संख्या 52 हजार 303 असून ऑनलाईन मंजूरी देण्यात आलेल्या अर्जांची संख्या 51 हजार 412 इतकी आहे.

करवीर तालुक्यातील ऑनलाईन प्राप्त अर्जांची संख्या 1 लाख 55 हजार 574 असून ऑनलाईन मंजूरी देण्यात आलेल्या अर्जांची संख्या 1 लाख 45 हजार 329 इतकी आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील ऑनलाईन प्राप्त अर्जांची संख्या 42 हजार 981 असून कालअखेर ऑनलाईन मंजूरी देण्यात आलेल्या अर्जांची संख्या 41 हजार 855 इतकी आहे.

भुदरगड तालुक्यातील ऑनलाईन प्राप्त अर्जांची संख्या 29 हजार 169 असून कालअखेर ऑनलाईन मंजूरी देण्यात आलेल्या अर्जांची संख्या 27 हजार 633 इतकी आहे.

गगनबावडा तालुक्यातील ऑनलाईन प्राप्त अर्जांची संख्या 7 हजार 232 असून ऑनलाईन मंजूरी देण्यात आलेल्या अर्जांची संख्या 6 हजार 842 इतकी आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 25 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Embed widget