एक्स्प्लोर
Advertisement
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
Kolhapur News : हा गुन्हा नरबळी आणि जादुटोणा कायद्यान्वये दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता गुप्तधन मिळण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न सुरू होता का? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) राधानगरी तालुक्यातील (Radhanagari) कौलवमध्ये गुप्तधन मिळवण्यासाठी धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरामध्ये खड्डा करून धार्मिक विधी करण्यात आल्याने हा नरबळीचा प्रयत्न होता का? अशी चर्चा आहे. शरद माने यांच्या घरामध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार सुरू होता. हा संपूर्ण प्रकार कौलवचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. राधानगरी पोलिसात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराडचा मांत्रिक चंद्रकांत धुमाळसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा नरबळी आणि जादुटोणा कायद्यान्वये दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता गुप्तधन मिळण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न सुरू होता का? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement