एक्स्प्लोर

Kolhapur Municipal Corporation : सुवर्णमहोत्सवी वर्षात कोल्हापूर मनपाला 'सुवर्णपदका'ची संधी! क्षयरोग विभागास सुवर्णपदक नामांकन

Kolhapur Municipal Corporation : 2015 पासूनच्या क्षयरोग कामकाजाचा आढावा केंद्र स्तरावरुन घेण्यात आला आहे. यामध्ये भारतातील विविध राज्यातील 21 जिल्ह्यांना नामांकन देण्यात आलेले आहे.

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महानगरपालिका सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्त गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन मनपाकडून करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर क्षयमुक्त भारत 2025 या मोहिमेचा एक भाग म्हणून केंद्र सरकार सब नॅशनल सर्टिफिकेशन उपक्रम राबवत आहे. यासाठी 2015 पासूनच्या क्षयरोग कामकाजाचा आढावा केंद्र सरकारकडून घेण्यात येत आहे. यामध्ये भारतातील विविध राज्यातील 21 जिल्ह्यांना नामांकन देण्यात आलेले आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा आणि शहर क्षयरोग केंद्र यांना सुवर्णपदकासाठी नामांकन प्राप्त झालं आहे. त्यामुळे सुवर्णमहोत्सवी वर्षात सुवर्णपदकाला गवसणी घातल्यास तो पालिकेच्या आजवरच्या कार्याचा गौरव असेल. पालिकेच्या कारभारावरून सातत्याने टीका होत असली, तरी आरोग्याच्या दृष्टीने महापालिकेची रुग्णालये सर्वसामान्यांना दिलासा देणारी ठरली आहेत. ग्रामीण जनताही त्याचा लाभ घेत आहे.  

दरम्यान,केंद्र सरकारने सन 2025 पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याचे महत्वकांक्षी धोरण ठरविले आहे. महाराष्ट्रासह सर्व राज्यांनी 2025 पर्यंत राज्य क्षयरोगमुक्त करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. मायक्रोबॅक्टीरियम ट्युबरक्युलॉसिस या जंतूने माणसाच्या शरीरात प्रवेश केल्याने क्षयरोग हा आजार होतो. क्षयरोग हा हवेव्दारे पसरणारा संसंर्गजन्य आजार आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विविध घटकांची पडताळणी करुन हे पदक बहाल करण्यात येणार आहे.

त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये क्षयरोगाविषयी सर्वेक्षण सुरु आहे. या सर्व्हेक्षणाला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. या सर्वेक्षण तपासणीमध्ये केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, कोल्हापूर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष विविध भागामध्ये भेट देत आहेत. यासाठी महानगरपालिका क्षयरोग विभाग आपल्या शहरात क्षयरोग निर्मूलनासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. 

एक जबाबदार नागरिक म्हणून सर्वांनी आपल्याकडे सर्वेक्षणासाठी आलेल्या सर्व्हेक्षण टीमला संपूर्ण खरी माहिती देऊन मोलाचे सहकार्य करुन क्षयमुक्त कोल्हापूर, भयमुक्त कोल्हापूर या उपक्रमाचे मानकरी व्हावे, असे आवाहन उप-आयुक्त रविकांत आडसुळ यांनी केले आहे. हे सुवर्णपदक प्राप्त करण्यासाठी महानगरपालिकेचे शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, डॉ.रुपाली दळवी, आरोग्य विभाग, क्षयरोग विभाग सज्ज आहे. तरी खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, ड्रग्ज डिस्ट्रीब्युटर, किरकोळ औषध विक्रेते यांनीही या पडताळणी कामी महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन क्षयरोग विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले

व्हिडीओ

Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं
Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget