Kolhapur municipal corporation elections 2022 : कोल्हापूर मनपा प्रभाग क्रमांक 14 राजारामपुरी परिसर
Kolhapur municipal corporation elections 2022 : कोल्हापूर शहरातील मुख्य बाजारपेठेचा बहुतांश परिसर प्रभाग क्रमांक 14 मध्ये येतो. याच भागामध्ये अनेक भव्य शोरुम आहेत. बाजूला झोपडपट्टी परिसर सुद्धा आहे.
Kolhapur municipal corporation elections 2022 : कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसर (KMC ward 14 rajarampuri) हा मुख्य बाजारपेठेचा बहुतांश परिसर प्रभाग क्रमांक 14 मध्ये येतो. याच भागामध्ये अनेक भव्यदिव्य शोरुम असल्याने उच्चभ्रूंचा या ठिकाणी वावर असतो. पार्किंगची समस्या या प्रभागात अतिशय गंभीर आहे.
प्रभाग क्रमांक 10 मध्ये समावेश असलेला भाग
राजारामपुरी परिसर, कमला काॅलेज, टाकाळा खण, जामसांडेकर माळ, राजारामपूरी विभागीय कार्यालय, स्मृती वन गार्डन, राजारामपुरी पोलिस ठाणे.
प्रभाग 10 मध्ये आरक्षण
प्रभाग क्रमांक 10 मध्ये 14 अ सर्वसाधारण महिला 14 ब सर्वसाधारण आणि 14 क सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहे.
प्रभागातील सद्यस्थिती काय
या प्रभागातून मागील वेळेस भाजपच्या सविता भालकर यांनी विजय मिळवला होता. आगामी निवडणुकीसाठी महेश उत्तुरे, प्रतिज्ञा उत्तुरे, मुरलीधर जाधव, दीपिका जाधव, दुर्गेस लिंग्रस, नितीन पाटील, अमर निंबाळकर, विजय सुर्यवंशी, विनायक सुर्यवंशी, अनिल कदम, संग्रामसिंह निंबाळकर, राजू भोसले, अभिजित शिंदे, विजय जाधव, विशाल देवकुळे, प्रकाश चौगुले, रहीम सनदी आणि राजू पसारे इच्छुक आहेत.
वाॅर्ड रचना कशी आहे ?
प्रभाग क्रमांक 14 मध्ये एकूण 16 हजार 940 लोकसंख्या येते. यामध्ये अनुसूचित जाती 1618, तर अनुसूचित जमातींची संख्या 55 आहे.
प्रभाग क्रमांक 14 मध्ये समाविष्ठ होणारा भाग
पूर्व भाग
टेंबलाई रेल्वे उड्डाण पूल खालील रेल्वे लाईनपासून दक्षिणेकडे बीएसएनएल टॉवर चौकापर्यंत
पश्चिम भाग
राजारामपुरी पोलिस स्टेशनचे पुर्व बाजू शिवाजी विद्यापीठ मेनरोड चौकापासून उत्तरेकडे विद्यापीठ ते शाहूमिल मुख्य रस्त्याने माऊली पुतळा चौक व शाळा नं.९ चे पुर्वेकडील रस्त्याने इंडिया स्क्रॅप ट्रेडर्स पर्यंत तेथून पुर्वेस राजारामपुरी ५ व्या गल्लीपर्यंत तेथून पूर्वेस ५ व्या गल्लीने नॅचरल आयस्क्रिम समोरील दक्षिण चौकापर्यंत तेथुन उत्तरेस चौथी गल्ली दक्षिणेकडील पॅसेजने पुर्वेकडे सिलाई वर्ल्ड कापड दुकानाची समोरील रस्त्यापर्यंत (राजारामपुरी मेन रोड)
दक्षिण
बीएसएनएल टॉवर चौक ते पश्चिमेस जामसांडेकर माळ झोपडपट्टीचे दक्षिण बाजूने मिलिटरी दी हॉस्पिटल मागील बाजू मिलीटरी पश्चिम हद्दीने दक्षिणेस सनशाईन वर्ल्ड वाईड स्कूलचे पूर्व व दक्षिण रस्त्याने उत्तरेकडे चैतन्य अपार्टमेंटचे उत्तरेकडून पश्चिमेकडे माळी कॉलनी मेन रस्तयाने धन्वंतरी मेडिकल समोरील डॉ.एल.बी आमटे मार्ग चौकातून दक्षिणेकडे विश्वनाथ अपार्टमेंटचे समोरून पश्चिमेकडे डॉ. संतोष रानडे हॉस्पिटलचे चौकापर्यंत (ताराराणी विद्यापीठ अग्नेय कपौंड) तेथून दक्षिणेकडे सेनापती बापट रोडने राजारामपुरी पोलिस स्टेशनचे पुर्व बाजू शिवाजी विद्यापीठ मेनरोड चौकापर्यंत
उत्तर
राजारामपुरी जनता बाजार चौक (पॅन्टालूम्स) पासून राजाराम रोडने पुर्वेस वि.स.खांडेकर चौकापर्यंत विहार अपार्टमेंट व महागावकर बंगलो सि.स.नं. ११४५ यांच्या मधून उत्तरेकडे एस. आर.डी बबल साईक्स एक्सटेंशनचे पश्चिमेकडील हद्दीने रेल्वे लाईनपर्यंत तेथून पुर्वेकडे रेल्वे लाईनने रेल्वे उड्डाण पुलापर्यंत
राजकीय बलाबल
या प्रभागातून मागील भाजपच्या सविता शशिकांत भालकर यांनी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांचा अवघ्या काही मताने पराभव केला होता.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी काँग्रेस |
इतर महत्त्वाच्या बातम्या