(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajaram Sakhar Karkhana : राजाराम कारखान्याच्या अपात्र सभासदांना 'सर्वोच्च' दिलासा! न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण आदेश
Rajaram Sakhar Karkhana : अपात्र सभासदांना बाजू मांडण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी द्यावा, यानंतरच पुढील तीन महिन्यात अपात्रतेवर निर्णय घेण्यात यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
Rajaram Sakhar Karkhana : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या (Rajaram Sakhar Karkhana) अपात्र 1346 सभासदांना आज सर्वोच्च न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे. अपात्र सभासदांना बाजू मांडण्यासाठी प्रादेशिक सहसंचालक कोल्हापूर विभागाने दोन महिन्यांचा कालावधी द्यावा, यानंतरच पुढील तीन महिन्यात अपात्रतेवर निर्णय घेण्यात यावा, असे महत्त्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश व्ही. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. नरसिंह यांच्या खंडपीठाने दिला. या निर्णयाने महाडिक मोठा दिलासा मिळाला आहे.
बोगस व कारखाना कार्यक्षेत्रा बाहेरच्या 1346 सभासदांना प्रादेशिक सहसंचालक आणि तत्कालीन सहकार पणन मंत्री यांनी अपात्र ठरविले होते. त्या 1346 सभासदांच्या अपात्रतेवर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने सत्तारुढ गटाला धक्का बसला होता. या निर्णयाचा सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्यावतीने याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता. सभासदांबाबत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीकडून एकूण 1 हजार 899 हरकती दाखल केल्या होत्या. याबाबतची सुनावणी कोल्हापूरच्या प्रादेशिक सहसंचालकांनी घेऊन 484 सभासद पात्र ठरविले होते. यापैकी मृत व दुबार असे 69 वगळून अपात्र 1008 व कार्य क्षेत्राबाहेरील 338 अशा 1346 सभासदांना प्रादेशिक सहसंचालकांनी अपात्र ठरविले होते.
मुंबई उच्च न्यायालयानेही अपील फेटाळले
या अपात्र सभासदांनी तत्कालीन सहकार व पणन मंत्री यांच्याकडे अपील दाखल केले होते. याबाबत त्यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यांनीही अपात्र सभासदांचे व कारखान्यांनी केलेले अपील फेटाळून लावले व प्रादेशिक सहसंचालकांचा 14 फेब्रुवारी 2020 रोजी दिलेला निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर या अपात्र सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मे. सी. व्ही. भडंग यांचेसमोर याबाबतची सविस्तर सुनावणी झाली. त्यांनी या 1346 अपात्र सभासदांचे अपिल फेटाळून लावत आदेश कायम ठेवला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने बाजू मांडण्यासाठी अवधी दिल्याने महाडिक गटासह अपात्र सभासदांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राजाराम कारखान्यावर गेल्या 28 वर्षांपासून महाडिकांची सत्ता
दरम्यान, राजाराम कारखान्यावर गेल्या 28 वर्षांपासून माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची सत्ता आहे. त्यामुळे कारखान्यात सत्तांतर करण्यासाठी सतेज पाटील यांनी रणशिंग फुंकले आहे. गेल्या निवडणुकीमध्ये थोड्या फरकाने सतेज पाटील पॅनेलचा पराभव झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या