एक्स्प्लोर

औरंगजेबाचे उदात्तीकरण होऊच शकत नाही, मुस्लिम कुटुंबांनी आपल्या लहान मुलांना इतिहास समजून सांगावा, आमदार हसन मुश्रीफांचे कळकळीचे आवाहन

Hasan Mushrif: कोल्हापूरमधील झालेली दंगल गुप्तचर यंत्रणेतील अपयश असल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूरमधील वातावरण बिघडत असल्याचे ते म्हणाले.

Hasan Mushrif: पुरोगामी कोल्हापूरला कलंक लावलेला जातीय तणाव निवळला असतानाच कागलमध्येही आक्षेपार्ह पोस्ट आढळून तणाव निर्माण झाला आहे. मात्र, पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करत पोस्ट करणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याचबरोबर कागलमधील चौकाचौकांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर माजी कामगार मंत्री कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी कागलमधील परिस्थितीवरून औरंगाजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांना कडक शब्दांमध्ये फटकारले आहे. औरंगजेब आपला कधीच होऊ शकत नाही, त्याचे उदात्तीकरण होऊच शकत नाही, असे मुश्रीफ यांनी सांगितले.  

मुस्लिम समाजातील कुटुंबांनी आपल्या लहान मुलांना समजावून सांगावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ते म्हणाले की, औरंगजेबचे उदात्तीकरण कधीच होऊ शकत नाही. मुस्लिम कुटुंबांनी आपल्या मुलांना समजावून सांगणं गरजेचं आहे. त्यांना इतिहास समजून सांगणं गरजेचं आहे. कोल्हापूरमधील झालेली दंगल गुप्तचर यंत्रणेतील अपयश असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूरमधील वातावरण बिघडत आहे. शिवरायांना मुसलमानांबद्दल कधीच आकस नव्हता. 22 वतनदार आणि सैन्याचे प्रमुख महाराजांसोबत मुस्लिम होते. तर मावळे मुस्लिम किती असतील. त्यामुळे औरंगजेब आपला शत्रूच आहे, त्याचे उदात्तीकरण होऊ शकत नाही. काल सुद्धा पोलिसांनी कागल मधील संबंधित मुलाला ताब्यात घेतलं असल्याचे त्यांनी सांगितले. 

कागलमध्ये काय घडलं? 

कागलमध्ये एका तरुणाने टिपू सुलतानचे स्टेटस लावल्याचे व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांसह काही आक्रमक तरुणांनी कागल पोलीस ठाण्याकडे धाव घेत कारवाईची मागणी केली. जमावाला परत जाण्यास सांगताना संबंधित तरुणाविरोधात गुन्हा नोंद केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गोसावी यांनी दोन्ही समाजातील लोकांसह व्यापार्‍यांना बोलावून बैठक घेत बंद न करण्याचे आवाहन केले. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बंद न करण्याची ग्वाही या बैठकीत दिली.  

वादग्रस्त स्टेट्सचे स्क्रीनशाॅट व्हायरल झाल्यानंतर कागल शहरात तणाव निर्माण झाला. त्यामुळे रविवारी संध्याकाळी आठच्या सुमारास खर्डेकर चौकात एकत्र आले आणि कारवाई करण्याची मागणी केली. खर्डेकर चौकानंतर गैबी चौकामध्येही तरुण एकत्र आले. त्यामुळे पोलिसांकडून रॅपिड अॅक्शन फोर्सला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी स्टेट्स व्हायरल करणाऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
Embed widget