Kolhapur News : कोल्हापूर, गडहिंग्लज, जयसिंगपूर बाजार समित्यांची निवडणूक रणधुमाळी आजपासून
Kolhapur Agricultural Produce Market Committee : कोल्हापूर बाजार समितीसाठी तुल्यबळ लढत अपेक्षित आहे. सत्तारुढ काँग्रेस, राष्ट्रवादी व जनसुराज्य , शेकाप आघाडी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न आहेत.
Kolhapur News : कोल्हापूरसह (Kolhapur Agricultural Produce Market Committee) गडहिंग्लज, जयसिंगपूर बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आजपासून रणधुमाळी सुरु होत आहे. 28 एप्रिल रोजी मतदान होणार असून मतदानानंतर पुढील तीन दिवसांमध्ये मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल. जिल्ह्यातील नव्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे मतदारयादीत समाविष्ठ करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. सुधारित मतदारयादी निश्चित झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी 3 एप्रिलपर्यंत शेवटची तारीख आहे. कोल्हापूर बाजार समितीसाठी तुल्यबळ लढत अपेक्षित आहे. सत्तारुढ काँग्रेस, राष्ट्रवादी व जनसुराज्य, शेकाप आघाडी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न आहेत. मात्र, राज्यातील बदलेल्या समीकरणानंतर आमदार विनय कोरेंच्या भूमिकेकडे लक्ष आहे. दुसरीकडे, भाजप आणि शिंदे गटाकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. उमेदवारी अर्जासोबत 7/12 उतारा, तलाठी रहिवाशी दाखला, आर्थिक दुर्बल गटासाठी तहसीलदारांचा दाखला, व्यापारी गटासाठी बाजार समितीचा बेबाकी दाखला जोडावा लागणार आहे.
जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीसाठी ग्रामपंचायत सदस्य, शेती सेवा संस्था, अडते व्यापारी आणि माथाडी कामगार हे मतदान करतात. दरम्यान, कोल्हापूर, जयसिंगपूर, गडहिंग्लज बाजार समितीत प्रत्येकी 18 जागा निवडून द्यावयाच्या आहेत. विकास सेवा संस्थातून 11 जागा आहेत. सात सर्वसाधारण, दोन महिला, प्रत्येकी एक भटक्या जाती आणि विमुक्त जाती-जमाती, ओबीसी तर ग्रामपंचायतीतून चार जागा निवडून द्यायच्या आहेत. त्यात दोन सर्वसाधारण, प्रत्येकी एक अर्थिक दुर्बल आणि अनुसुचित जाती, अडते आणि व्यापारी प्रतिनिधी दोन जागा तर तोलाई आणि हमाल एक अशा 18 जागांसाठी निवडणूक आहे.
निवडणूक कार्यक्रम
- 27 मार्च : निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे
- 3 एप्रिल : अर्ज भरण्याची अंतिम मुदत
- 5 एप्रिल : अर्ज छाननी
- 6 एप्रिल : वैध अर्ज प्रसिद्ध होणार
- 20 एप्रिल : अर्ज माघाराची मुदत
- 21 एप्रिल : चिन्ह वाटप
- 28 एप्रिल : मतदान
- मतदान दिवसापासून पुढील तीन दिवसांच्या आत निकाल जाहीर होईल.
महत्वाच्या इतर बातम्या :