कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांच्या सहकारी पतसंस्था निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा विजयी चौकार
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या सत्ताधाऱ्यांनी विजयी चौकार मारला आहे. दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी सहकार आघाडीने 21 पैकी 21 जागा जिंकल्या.
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या सत्ताधाऱ्यांनी विजयी चौकार मारला आहे. दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी सहकार आघाडीने 21 पैकी 21 जागा जिंकत आमदार जयंत आसगावकर यांच्या पॅनेलचा पुरता धुव्वा उडवला. लाड यांच्या नेतृत्वात सत्ताधारी आघाडीने विजयी चौकार लगावला आहे.
कोजिमाशिच्या 21 जागांसाठी 47 उमेदवार रिंगणात होते. कोजिमाशिची सभासद संख्या 8 हजार 526 इतकी आहे. त्यापैकी 8 हजार 106 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. कोजिमाशिच्या निवडणुकीमुळे चांगलाच धुरळा उडाला होता. आरोप-प्रत्यारोपांनी निवडणूक गाजली होती. कोजिमाशिचे विद्यमान चेअरमन बाळ डेळेकर व संचालक राजेंद्र रानमाळे यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली. संचालक अनिल चव्हाण दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रदीप मालगावे यांनी काम पाहिले.
कोजिमाशिमध्ये गेल्या 18 वर्षांपासून दादा लाड यांची एकहाती सत्ता आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच दादा लाड त्यांच्या सत्ताधारी गटाने आघाडी घेतली. प्रत्येक फेरीनुसार ही आघाडी वाढत गेली आणि दादा लाड यांनी कोजिमाशिवर आपलेच वर्चस्व असल्याचे सिद्ध करून दाखवले.
विजयी उमेदवार खालीलप्रमाणे आहेत
सर्वसाधारण प्रतिनिधी गट श्रीकांत कदम (4541), प्रकाश कोकाटे ( 4504), सुभाष खामकर (4634,), दत्तात्रय घुगरे (4597), अविनाश चौगुले (4650), लक्ष्मण् डेळेकर (4505), शरद तावदारे (4322), मदन निकम (4455), श्रीकांत पाटील (4632), उत्तम पाटील (4596), दीपक पाटील (4727), मनोहर पाटील (4363), राजेंद्र मारुती पाटील (4493), राजेंद्र रानमाळे (4549), सचिन शिंदे (4270), पांडूरंग हळदकर (4047). अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी- अनिल चव्हाण (4691), भटक्या विमुक्त जाती – जितेंद्र म्हैशाळे (4780). इतर मागासवर्ग प्रतिनिधी राजाराम शिंदे (4835). महिला राखीव प्रतिनिधी ऋतुजा पाटील (4641) व शितल हिरेमठ (4624)
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Kolhapur 6 Nagarpalika Election 2022 : कोल्हापूर जिल्ह्यातील 6 नगरपालिकांसाठी रणधुमाळी सुरु, पण लक्ष लागले नगराध्यक्ष निवड आणि ओबीसी आरक्षणाकडे
- Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीसाठी 13 जुलैला आरक्षण जाहीर होणार
- Rajesh Kshirsagar : राजेश क्षीरसागर ज्या चंद्रकांतदादांना हिमालयात पाठवू, पाठीत खंजीर खूपसला म्हणत होते, तेच आता एकाच फलकावर झळकले!
- Kolhapur municipal corporation elections 2022 : कोल्हापूर महापालिकेची अंतिम मतदार यादी 16 जुलैला प्रसिद्ध होणार
- Rajesh Kshirsagar : शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर म्हणतात, चंद्रकांत पाटील कोल्हापूर जिल्ह्याचे नव्हे, तर राज्याचे नेते