Kolhapur District Gram Panchayat Election : जिल्ह्यातील 480 ग्रामपंचायतींसाठी 6 जुनला आरक्षण सोडत
कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील 480 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. प्रभाग निश्चित झाल्याने आरक्षण सोडत काढली जाणार आहे. सोमवारी 6 जुन रोजी विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण काढले जाणार आहे.
Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात आगामी काही काळामध्ये निवडणुकीचा ज्वर असणार आहे. महापालिकेसह, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे राजकीय धुळवड चांगलीच रंगणार आहे. कोल्हापूर मनपाचे प्रभाग आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता जिल्ह्यातील 480 ग्रामपंचायतींसाठी 6 जुनला आरक्षण सोडत होत आहे.
जिल्ह्यातील 480 ग्रामपंचायतींसाठी ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होत आहेत. त्याची आता तयारी सुरु करण्यात आली आहे. प्रभाग निश्चित झाल्यानंतर आरक्षण निश्चित सोडत काढली जाणार आहे. सोमवारी 6 जुन रोजी विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण काढले जाणार आहे. त्यामध्ये काही हरकती आल्यास त्यावर सुनावणी झाल्यानंतर 17 जुन रोजी आरक्षणावर शिक्कामोर्तब केलं जाईल.
480 ग्रामपंचायतींमध्ये ओबीसी आरक्षण नसेल
शहराला लागून असलेल्या प्रमुख गावांसह 480 ग्रामपंचायतींमध्ये ओबीसी आरक्षणावर सार्वत्रिक निवडणुका होतील.या पंचायतींसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये मुदत संपलेल्या तसेच डिसेंबर 2021 ते 2022 या कालावधीमध्ये मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.त्यानुसार प्रभाग रचना सुरु होती, त्याला आता जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे.
Kolhapur District Gram Panchayat Election : कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक ?
- करवीर 53
- कागल 27
- पन्हाळा 50
- शाहूवाडी 49
- हातकणंगले 39
- शिरोळ 17
- राधानगरी 67
- गगनबावडा 21
- गडहिंग्लज 34
- आजरा 37
- भुदरगड 45
- चंदगड 41
विद्यमान तसेच इच्छूक आमदारांचा कस लागणार
महापालिकेसह जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार पडत असल्याने अर्थातच ही एक प्रकारे विधानसभेची तयारी असेल. त्यामुळे इच्छूक आमदारांसह विद्यमान आमदारांचा कस लागणार आहे. या निवडणुका पार पडल्यानंतर विधानसभेसाठी काऊंटडाऊन सुरू होणार आहे. त्यामुळे या सर्वांसाठी या निवडणुका काटेरी आव्हान असेल.
इतर महत्वाच्या बातम्या
- Kolhapur crime : मेहुणीने पत्नीला वाईटमार्गाला लावल्याने अनैतिक संबंध जुळले, पत्नीवर वार करून पतीची आत्महत्या
- Kolhapur : होम मिनिस्टरमध्ये अवतरली कोल्हापुरी' उखाणा क्वीन' ! Non Stop सव्वा तीन मिनिटांच्या उखाण्यात अख्खं कोल्हापूर फिरवलं !
- Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यावर यंदाही महापुराची टांगती तलवार, सरासरीच्या तुलनेत 106 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज