Kolhapur Crime : अनेक महिलांशी अश्लील चाळे करुन व्हिडीओ करणाऱ्या बोगस डाॅक्टरला अखेर अटक
Kolhapur Crime: महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या या डाॅक्टरविरोधात कागल तालुक्यामधील मुरगुडमध्ये मोर्चाही काढण्यात आला होता. अटक टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या या बोगस डाॅक्टरला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) कागल तालुक्यातील मुरगुडमध्ये रुग्णालयात आलेल्या महिलांशी अश्लील चाळे करुन पेशाला काळीमा फासणाऱ्या बोगस डाॅक्टरला अखेर अटक करण्यात आली आहे. दत्तात्रय शामराव कदम असे त्याचे नाव आहे. महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या या डाॅक्टरविरोधात कागल तालुक्यामधील मुरगुडमध्ये मोर्चाही काढण्यात आला होता. अटक टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या या बोगस डाॅक्टरला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मोर्चा निघूनही कोणीच तक्रार देण्यासाठी पुढे येत असल्याने पोलिसांनी या प्रकरणात स्वत: गुन्हा दाखल केला होता.
बोगस डाॅक्टरकडून पेशाला काळीमा
कदमला अटकेनंतर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक टाळण्यासाठी त्याने भरपूर प्रयत्न केले होते. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्याने प्रयत्न केले होते. मात्र त्याचा अर्ज फेटाळून लावण्यात आला. कागलचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी त्याला अटक झाल्याची माहिती दिली. दत्तात्रय कदम हा गेल्या अनेक वर्षांपासून मुरगूडमध्ये आयुर्वेदिक दवाखाना चालवत होता. तालुक्यासह बाहेरुनही त्याच्याकडे औषधासाठी रुग्ण येत होते. यावेळी दवाखान्यात येणाऱ्या महिला रुग्णांशी जवळीक करत त्याने व्हिडीओ क्लिप तयार केल्या होत्या. या क्लिप व्हायरल झाल्यानंतर मुरगुडमध्ये संतापाची लाट पसरली होती. मोर्चा निघूनही कदमविरोधात कोणी तक्रार दाखल केली नव्हती.
पोलिसांकडून स्वत:हून गुन्हा दाखल
मुरगुड शहरातील निनावी पत्रे विविध माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या बातम्या तसेच निनावी पत्रातून होत असलेल्या व्हिडीओ चित्रीकरणाची चर्चा, डॉ. कदमचे नग्न स्वरुपातील फोटोंच्या प्रसारित झालेल्या झेरॉक्स प्रती या पार्श्वभूमीवर योग्य तो तपास होण्यासाठी पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी फिर्याद दाखल केली होती. अश्लील चित्रफिती व्हायरल झाल्यानंतर शहरातील वातावरण गढूळ बनल्याने या प्रकरणाची शहर परिसरात या प्रकरणाची चांगलीच चर्चा होती. यानंतर शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी तत्कालिन जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांनाही भेटून संशयिताला अटक करण्याची मागणी केली होती. संशयितांना अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यालाही ताब्यात घेऊन पोलिसांनी सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी शहरातील नागरिकांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर आता पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या