लॉजवर गेले अन् वादाला सुरुवात, कोल्हापुरात प्रियकराने प्रेयसीला जागेवर संपवलं; बायकोचाही काढला होता काटा
Kolhapur Crime : कोल्हापुरात प्रियकराने प्रेयसीची हातोड्याचे घाव घालून निर्घृणपणे हत्या केलीये.

Kolhapur Crime : लॉजवर गेल्यानंतर प्रियकर आणि प्रेयसीमध्ये वाद झाला आणि या वादातून प्रियकराने प्रियसीला क्रूरपणे संपवल्याची घटना कोल्हापुरात (Kolhapur Crime) घडलीये. सांगली कोल्हापूर रोडवरील रूकडी फाटा येथील सागरीका लॉजवर प्रियकराने प्रेयसी महिलेचा निर्घृणपणे खून (Kolhapur Crime) केलाय. सुमन सुरेश सरगर असे मृत महिलेचे नाव असून आदमगौस पठाण असं संशयित आरोपीचे नाव आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात (Kolhapur Crime) एकच खळबळ उडाली आहे.
रुकडीतील सागरिका लॉजवर प्रियकराने केला प्रेयसीचा खून
अधिकची माहिती अशी की, सांगली कोल्हापूर रोडवरील रूकडी फाटा येथील सागरीका लॉजवर महिलेचा खून झालाय. प्रियकराने प्रियसी महिलेचा हातोड्याचे घाव घालून निर्घृणपणे खून केलाय. सुमन सुरेश सरगर खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून आदमगौस पठाण आरोपी प्रियकराचं नाव आहे. प्रियकर पठाण आणि सुमन हे रुकडे येथील सागरिका लॉजवर गेले होते. मात्र, यावेळी प्रियकर पठाण आणि सुमन सरगर यांच्यात आर्थिक वाद झाला आणि त्यातून खून झाल्याची माहिती समोर आली आहे.
पठाणने यापूर्वी बायकोचाही केला होता खून
दरम्यान, प्रेयसीची हत्या करणाऱ्या पठाणची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. लॉजवर नेऊन प्रेयसीला संपवणाऱ्या पठाणने यापूर्वी स्वत:च्या पत्नीची देखील क्रूरपणे हत्या केली होती. दरम्यान, आता त्याने आर्थिक वादातून प्रेयसी सुमन सुरेश सरगर हिला देखील क्रूरपणे संपवलं आहे.
बायकोचा खून करणाऱ्या पठाणने प्रेयसीलाही क्रूरपणे संपवलं
विशेष म्हणजे पहिल्या बायकोची हत्या केल्यानंतर आदमगौस पठाण याचे बाहेर आल्यानंतर सुमन सरगर हिच्याशी प्रेम संबंध जुळले होते. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या गाठी-भेटी होत होत्या. मात्र, आदमगौस पठाण याने बायकोचे जे हाल केले तेच आता प्रेयसीचे केल्याचे समोर आले आहे. आदमगौस पठाण याने सुमन सरगर हित्या शरीरावर अक्षरश: हतोड्याने मारहाण करुन तिला संपवलं आहे. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पत्नीची हत्या केलेल्या व्यक्तीबरोबर महिलेने प्रेमसंबंध का निर्माण केले? असा सवालही सोशल मीडियावर सध्या विचारला जातोय.
इतर महत्त्वाच्या बातम्या























