(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News: अवघ्या 15 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेची आत्महत्या; अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी
अवघ्या 15 दिवसांपूर्वी विवाह झाल्याने प्रभावळे कुटुंब आनंदात असतानाच भाग्यश्रीच्या टोकाच्या निर्णयाने कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. आत्महत्या का केली? याबाबत माहिती मिळालेली नाही.
Kolhapur Crime: कोल्हापुरात धक्कादायक आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. आता या यादीमध्ये नवविवाहितेची भर पडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील निवडेमधील अवघ्या 15 दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या नवविवाहिताने घरी कोणीही नसताना आत्महत्या केली. भाग्यश्री अक्षय प्रभावळे (वय 22) असे त्या नवविवाहितेचं नाव आहे. घरातील पंख्याला ओढणीने गळफास तिने आयुष्याचा शेवट केला. अवघ्या 15 दिवसांपूर्वी विवाह झाल्याने प्रभावळे कुटुंब आनंदात असतानाच भाग्यश्रीच्या टोकाच्या निर्णयाने कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. भाग्यश्रीने नेमक्या कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली? याबाबत माहिती मिळालेली नाही. निगडेमधील अक्षय प्रभावळेशी भाग्यश्रीचा अवघ्या 15 दिवसांपूर्वीच विवाह झाला होता.
स्वतःचा फोटो स्टेटसवर ठेवत भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आत्महत्या
कोल्हापूर शहरात वयाची पंचवीशीसुद्धा पार न केलेल्या एकुलत्या एक असलेल्या तरुणाने व्हाॅट्सअॅपला स्वत:चा फोटो ठेवत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कळंब्यात घडली होती. अवधूत अजित डाकवे (वय 24, रा. डाकवे गल्ली, मंगळवार पेठ, सध्या कळंबा) असे त्याचे नाव आहे. बालपणीच वडिलांचे छत्र हरवल्यानंतर तो आणि आईसह राहत होता. अवधूत आई सुरेखा हे दोघेच मंगळवार पेठेतील डाकवे गल्लीत राहत होते. त्याच्या बालपणीच वडिलांचे निधन झाले आहे. त्यानंतर आईने त्याचा सांभाळ केला होता. दोघेही आई एका खासगी दवाखान्यात नोकरी करत होते. नेहमीप्रमाणे दोघेही दवाखान्यात बाहेर पाडल्यानंतर आई जेवण करण्यासाठी स्वयंपाक घरात गेली. अवधूतने दुसऱ्या खोलीत मोबाईलवर स्वतःचा फोटो स्टेटसवर ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे हा स्टेटस मित्रांसह नातेवाईकांनी पाहिल्यानंतर त्याला तातडीने फोन केला, पण त्याचा फोन बंद होता. स्टेटस अपडेट केल्यानंतर अवधूतने लोखंडी पाईपला टॉवेलने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. गळफास सोडवून अवधूतला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
लव्ह मॅरेज केलेल्या उच्चशिक्षित जोडप्याचा आत्महत्येचा प्रयत्न
दुसरीकडे उच्चशिक्षित आणि प्रेमविवाह करून नव्या आयुष्याला सुरुवात केलेल्या जोडप्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार एप्रिल महिन्यात कोल्हापुरातील गोकुळ शिरगावमध्ये घडला होता. राहुल पाटील या तरुणाचा 22 वर्षीय वैष्णवीशी प्रेमविवाह झाला होता. दोघांमध्ये कौटुंबिक कारणातून वाद झाला होता. याच वादातून राहुलने प्रथम फॅनला साडीने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पती राहुलने गळफास घेतल्याचे दिसताच पत्नी वैष्णवीने फास काढून घेत वाचवले. यानंतर वैष्णवीने सुद्धा तोच प्रकार करताना साडीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहुलने तिचा फास सोडवला.
इतर महत्वाच्या बातम्या