एक्स्प्लोर

Kolhapur ZP Election : मतदान केलं आणि नंतर EVM मशिन जमिनीवर आपटून फोडून टाकलं; कोल्हापुरातील प्रकार

Bhudargad Nadhavade ZP Election : ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्याकडून निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित करत त्यासंबंधी एक पोस्ट शेअर करण्यात आली. त्यानंतर त्याने ईव्हीएम फोडून टाकल्याची घटना घडली. 

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असतानाच नाधवडे येथील एका मतदान केंद्रावर शनिवारी दुपारी गोंधळाची घटना घडली. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात या मागणीसाठी एका मतदाराने मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीन जमीन आपटून फोडून टाकलं. या प्रकारामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. जयवंत वायदंडे असं त्या व्यक्तीचं नाव असून ते शिवसेना ठाकरे गटाच्या ग्राहक सेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. 

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी जयवंत वायदंडे यांनी मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीन जमिनीवर आपटून फोडून टाकलं. या कृतीतून त्यांनी निवडणूक आयोगासह शासन आणि निवडणूक विभागाचा निषेध व्यक्त केला. 

निवडणूक प्रक्रियेवर आक्षेपार्ह पोस्ट

जयवंत वायदंडे यांनी निवडणूक प्रक्रियेसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याची चर्चा होती. त्यामुळे त्याच्या हालचालीवर बारीक लक्ष होते. शनिवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास मतदान केल्यानंतर जयवंत वायदंडे यांनी ईव्हीएम मशीन जमिनीवर जोरात आपटले. 

अचानक केलेल्या या कृतीमुळे मतदान केंद्रावर उपस्थित मतदारांमध्ये गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तावर असलेले पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक योगेश गोरे यांनी संबंधित व्यक्तीस ताब्यात घेतले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर काही वेळातच मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली. जयवंत वायदंडे याच्यावर कारवाईची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये 74. 35 टक्के इतकं मतदान झालं आहे. सोमवारी, 9 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. 

दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणूकीच्या धामधूमीत दोन गावं अशी होती ज्या गावात आज एकही मत नोंदवलं गेलं नाही. तासगाव तालुक्यातील बलगवडे आणि परभणीच्या सेलू तालुक्यातील बोथ गावाने मतदानावर बहिष्कार टाकला. बलगवडे गावातील गायरान जमिनीवर सोलर प्रकल्पासाठी मोठी वृक्षतोड झाली. या वृक्षतोडीच्या निषेधार्थ मतदारांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला. तर परभणीच्या बोथ गावाने रस्ता आणि नदीवरच्या पुलाच्या मागणीसाठी मतदान न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही गावातल्या गावकऱ्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले गेले जे अयशस्वी ठरले. 

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Embed widget