Kolhapur Accident: पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भरधाव इर्टिगाच्या धडकेत रोड रोलर थेट पलटी; भीषण अपघातात दोन ठार, चार गंभीर जखमी
Kolhapur Accident: या अपघाताची भीषणता इतकी भयान होती की, रोलर पलटी होऊन बाजूला कोसळला, तर अपघातग्रस्त इर्टिगाचे तोंड दक्षिणेकडून उत्तरेकडे होत समोरुन चक्काचूर झाला.
Kolhapur Accident: पुणे बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर (Kolhapur News) हद्दीत किणी टोल नाका ते घुणकी फाट्यादरम्यान पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने येत असलेल्या इर्टिंगा कारने रोड रोलरला दिलेल्या भीषण धडकेत दोघांचा मृत्यू झाला. या अपघाताची भीषणता इतकी भयान होती की, रोलर पलटी होऊन बाजूला कोसळला, तर अपघातग्रस्त इर्टिगाचे तोंड दक्षिणेकडून उत्तरेकडे होत समोरुन चक्काचूर झाला. राहुल अशोक शिखरे (वय 30 रा. मिणचे) व सुयोग दत्तात्रय पवार (वय 28 रा. टोप) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
तिघांची प्रकृती चिंताजनक
अपघातातानंतर सुयोग पवार (वय 28), सुनील कुरणे (वय 24), वैभव चौगुले (वय 23) अनिकेत जाधव (वय 22), निखील शिखरे (वय 27) राहुल शिखरे (वय 30) या सहा जणांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सुयोग आणि राहुलचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. यामधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. किणी टोलनाका ते घुणकी फाट्यादरम्यान आज सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त इर्टिगामधील तरुण मुंबईत प्रदर्शन पाहण्यासाठी गेले होते. प्रदर्शन पाहून झाल्यानंतर शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारस मुंबईवरून कोल्हापूरसाठी प्रवास सुरू केला. इर्टिका गाडीने (एमएच-48-एके-6545) घरी येत असतानाच त्यांच्यासोबत आणखी एक गाडी होती.
मदतीसाठी तरुणांचा आक्रोश
मध्यरात्री पुण्याजवळ सर्वांनी चहा घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या दिशेने प्रवास सुरु केला. आज (27 मे) सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर हद्दीत किणी टोलनाक्याच्या दिशेने चाललेल्या डोजरला अत्यंत भरधाव वेगात असलेल्या इर्टिकाने मागून धडक दिली. यानंतर रस्त्याच्या बाजूने जाणारा डोजर पलटी झाला. अपघातानंतर इर्टिगामधील तरुणांनी मदतीसाठी आक्रोश केला. यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी आणि महामार्गावरील प्रवाशांनी मदतकार्य सुरु केले. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. यावेळी घटनास्थळी अंगावर शहारे आणणारे दृश्य होते. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
दुसरीकडे 10 दिवसांपूर्वी सांगलीमध्ये नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मिरजजवळ वड्डी गावच्या हद्दीत रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेने विटा घेऊन येत असलेल्या भरधाव ट्रॅक्टर आणि बोलेरोची समोरासमोर धडक होऊन कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सरवडे गावातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा अंत झाला होता. पंढरपूरला देवदर्शनासाठी जात असतानाच वाटेतच ट्रॅक्टर काळ बनून आल्याने हकनाक कुटुंबाचा बळी गेला. ही धडक इतकी भीषण होती की बोलेरो ट्रॅक्टरमध्ये घुसली गेली. यामध्ये पाच जणांचा जागीच अंत झाला.
इतर महत्वाच्या बातम्या