एक्स्प्लोर

Kolhapur Jaggery : कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी गूळ सौदे बंद; 50 टक्के मजुरी वाढ करण्याची माथाडी कामगारांची मागणी

Kolhapur Jaggery : कोल्हापूर मार्केट यार्डमध्ये सलग दुसऱ्या दिवशी गूळ सौदे बंद राहिले. 50 टक्के मजुरी वाढच्या मागणीसाठी माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने गूळ सौद्यांवर परिणाम झाला आहे.

Kolhapur Jaggery : कोल्हापूर मार्केट यार्डमध्ये सलग दुसऱ्या दिवशी गूळ सौदे बंद राहिले. 50 टक्के मजुरी वाढच्या मागणीसाठी माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने गूळ सौद्यांवर परिणाम झाला आहे. परिणामी यंदाच्या गूळ हंगामात दोन महिन्यांत दुसऱ्यांदा गूळ सौदे बंद पडले आहेत दरम्यान, या  वादावर तोडगा काढण्यासाठी आज जिल्हा उपनिबंधक यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होत आहे. दुसरीकडे हमालांच्या काम बंद आंदोलनामुळे गुळ सौदे बंद पडले आहेत.

दरम्यान, बाजार समितीने मंगळवारी सायंकाळी माथाडी कामगारांची बैठक घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, माथाडी कामगार मागणीवर ठाम राहिल्याने चर्चा फिस्कटली होती. त्यामुळे आजही सौदे बंद राहिले. दरम्यान, यार्डातील गूळ सौद्यात 5 हजार गूळ रव्यांची आवक होत असून 3 हजार रव्यांचे सौदे पूर्ण झाले आहेत. माथाडी कामगारांनी 50 टक्के मजुरी वाढीची मागणी केल्यानंतर व्यापाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे माथाडी सौदे सोडून गेले. त्यामुळे गूळ भरणे, उतरणे, तोलाई काम ठप्प झाले.  माथाडी कामगारांची समजूत काढण्यासाठी बाजार समिती प्रशासक मंडळाकडून मंगळवारी सायंकाळी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत माथाडी कामगारांनी मजुरी वाढीची मागणी लावून धरली. 

50 टक्के मजुरीवाढीवर माथाडी ठाम

माथाडी कामात गूळ रव्यांची भरणी उतरणी, तोलाई, पॅकिंग, थप्पी लावण्यासाठी मजुरी दर माथाडी बोर्ड, बाजार समितीने निश्चित केले आहेत. त्यानुसार 30 किलोच्या रव्यांसाठी 6 रुपये 58 पैसे सध्या मजुरी मिळते. यात 50 टक्के वाढ करावी, पुढील तीन वर्षांसाठी वाढ असावी, अशी मागणी माथाडींनी केली आहे. या  वादावर तोडगा काढण्यासाठी आज जिल्हा उपनिबंधक यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होत आहे. दुसरीकडे  हमालांच्या  काम बंद आंदोलनामुळे गुळ सौदे बंद पडले आहेत.

यापूर्वी, गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाला किमान 3700 रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी गुळ सौदे बंद पाडले होते. तीन दिवसांनी मार्केट यार्डात गुळाचे सौदे पूर्ववत सुरु झाले होते. 22 नोव्हेंबर रोजी गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी कर्नाटकात तयार झालेला गूळ हा कोल्हापूरचा गूळ म्हणून मोठ्या प्रमाणावर विक्रीला येत असल्याचे समोर आणले. कर्नाटकी गुळाची पोलखोल शेतकऱ्यांनी प्रशासकांसमोर केली होती.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Embed widget