Prakash Awade : इचलकरंजी भाजपकडून आमदार प्रकाश आवाडे बेदखल; हाळवणकर समर्थकांमध्ये नाराजी कायम, मनोमिलन नाहीच!
Prakash Awade : कोल्हापूरमध्ये भाजपचा पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये आवाडे पिता पुत्रांनी भाजप प्रवेश केला होता.
Ichalkaranji Vidhan Sabha : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेल्या इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या समर्थकांमध्ये अजूनही मनोमिलन झालेलं नाही. इचलकरंजीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा होत आहे. मात्र, या दौऱ्यापूर्वीच भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. इतकेच नव्हे तर आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केल्यानंतरही इचलकरंजी भाजपकडून आमदार आवाडे अजूनही बेदखल असल्याचे समोर आलं आहे.
दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये नाराजी कायम
आज (17 ऑक्टोबर) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या मेळाव्याला आमदार प्रकाश आव्हाडे यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे राजकीय भूवया उंचावल्या आहेत. कोल्हापूरमध्ये भाजपचा पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये आवाडे पिता पुत्रांनी भाजप प्रवेश केला होता. व्यासपीठावर सुरेश हळवणकर हेच राहुल आवाडे आणि आमदार प्रकाश आवाडे यांना घेऊन आले होते. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झालं असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती. मात्र गेल्या महिनाभरापासून आवाडे यांचा पक्षप्रवेश झाला असला, तरी त्यांचा अजून स्वागत मात्र काही करण्यात आलेलं नाही. त्यामुळे आवाडे भाजपमध्ये आले तरी, दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये नाराजी कायम आहे.
प्रकाश आवाडे यांनी सुरेश हळवणकर यांचा पराभव केला होता
दरम्यान, मागील निवडणुकीमध्ये प्रकाश आवाडे यांनी सुरेश हळवणकर यांचा पराभव केला होता. त्यामुळे नाराजी अजूनही कायम आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये ते कोणती भूमिका घेणार याकडे सुद्धा लक्ष होते. दरम्यान आमदार आवाडे हे उमेदवारीचा शब्द घेऊनच भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती. त्यामुळे सुरेश हळवणकर यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाणार का? याकडे सुद्धा लक्ष होतं. मात्र, सुरेश हळवणकर गटाची नाराजी पाहता त्यांना कोणत्याही प्रकारचा शब्द देण्यात आलेला नव्हता का? अशी सुद्धा चर्चा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या