एक्स्प्लोर

Hatkanangle Loksabha : सांगलीत विश्वजित कदम 'विशाल' विजयाचे किंगमेकर, पण हातकणंगलेत जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यातून अपेक्षित मताधिक्य नाही!

सांगलीमधील माजी दोन भाजप आमदारांसह सांगली मिरजमधील आजी माजी नगरसेवकांनी सुद्धा विशाल पाटील यांची बाजू लावून धरली. त्यामुळे विशाल पाटील यांचा मार्ग दिल्लीपर्यंत प्रशस्त झाला.

Hatkanangle Loksabha : सांगली लोकसभेला ठाकरे गटाकडून उमेदवारी एकतर्फी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी करत लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी भाजप खासदार संजय पाटील यांची हॅट्रिक रोखत एक लाखांवर मताधिक्य घेत विजय खेचून आणला. त्यांच्या विजयामध्ये काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा मोलाचा वाटा राहिला. सांगली हा नेहमीच काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. तुलनेत शिवसेनेचं स्थान नगण्य आहे. मात्र, चंद्रहार पाटील यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आल्यानंतर सांगली काँग्रेसमध्येही नाराजी पसरल होती.

सागंलीवरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडणार का? अशी चर्चाही रंगली होती. सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस आमने सामने आले होते. सातत्याने दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. दुसऱ्या बाजूने विशाल पाटलांचा कोण करेक्ट कार्यक्रम करत आहे अशी सुद्धा चर्चा सांगलीच्या वर्तुळामध्ये रंगली होती. मात्र, विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने सांगलीमध्ये अनेक दशके प्रभाव राखलेल्या वसंतदादा पाटील घराण्यावर अन्याय  असल्याचे आणि विशाल पाटलांवर सुद्धा अन्याय होत असल्याची भावना तयार झाली होती. सांगलीमधील माजी दोन भाजप आमदारांसह सांगली मिरजमधील आजी माजी नगरसेवकांनी सुद्धा विशाल पाटील यांची बाजू लावून धरली. त्यामुळे विशाल पाटील यांचा मार्ग दिल्लीपर्यंत प्रशस्त झाला.

विश्वजित कदमांच्या पलूस कडेगावमधून सर्वाधिक मताधिक्य 

विशाल पाटील यांची बाजू लावून धरल्याने काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्यावर ठाकरे गटाकडून सातत्याने प्रहार सुरू होता. मात्र, विश्वजीत कदम यांनी सुद्धा आघाडीधर्म सांभाळत संजय राऊत तसेच ठाकरे गटाकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते आणि तसेच आम्हीच सांगलीचे वाघ असल्याचे ठणकावून सांगितले होते. आता निकालामध्ये सुद्धा यांनी सांगलीचे वाघ असल्याचे सिद्ध केलं आहे. 

दरम्यान, विशाल पाटील यांना सर्वाधिक विश्वजीत कदम यांच्या पलूस कडेगाव मतदार संघातून आणि मिरजेमधून मताधिक्य मिळालं आहे विशाल पाटील यांना मिरजेमधून एक लाख 9 हजार110 मते मिळाली, तर संजय पाटील यांना 84 हजार 29 मते मिळाली. सांगलीमधून एक लाख 5 हजार 185 मते विशाल पाटील यांना मिळाली. संजय पाटील यांना 85,993 मते मिळाली. विश्वजित कदम यांच्या पलूस कडेगावमध्ये 95 हजार 558 मते विशाल पाटील यांना मिळाली, तर संजय पाटील यांना 59 हजार 376 मते मिळाली. खानापूरमध्ये 92 हजार 459 मते विशाल पाटील यांना मिळाली, तर संजय पाटील यांना 75 हजार 795 मते मिळाली. तासगाव कवठेमहांकाळमधून 94 हजार 485 मध्ये विशाल पाटील यांना मिळाली तर संजय पाटील यांना 85 हजार 74 मते मिळाली. जतमध्ये 72 हजार 854 मते विशाल पाटील यांना मिळाली,  तर संजय पाटील यांना 19 हजार 125 मते मिळाली. 

जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यातून अपेक्षित मताधिक्य नाही 

दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरूडकर यांना अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये पराभव स्वीकाराव लागला. त्यांचा शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांनी पराभव केला. अवघ्या 13 हजार 399 मतांनी सत्यजित पाटील यांचा पराभव झाला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये इस्लामपूर आणि शिराळा हे सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ येतात. या दोन्ही मतदारसंघात जयंत पाटील यांचेच प्राबल्य आहे. किंबहुना त्यांचाच बालेकिल्ला समजला जातो. या पट्ट्यात साखर कारखानदारही सर्वाधिक आहेत. 

मात्र, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून आणि शिराळा विधानसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना अपेक्षित मताधिक्य मिळालं नसल्याचे स्पष्ट झालं आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून माने यांना 58 हजार 944 मते मिळाली. सत्यजित पाटील यांना 76 हजार 425 मते मिळाली. त्यामुळे 16 हजारांच्या घरात पाटील यांना मताधिक्य मिळाले. जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असतानाही अपेक्षित मताधिक्य मिळालेलं नाही. दुसरीकडे, शिराळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार मानसिंग नाईक करतात.  या मतदारसंघातून अवघ्या दहा हजारांच्या घरात मताधिक्य सत्यजित पाटील यांना मिळालं आहे. माने यांना 80 हजार 720 मते मिळाली. सत्यजित पाटील यांना 90 हजार मते मिळाली. दोघांच्या लढतीत राजू शेट्टीम मात्र तिसऱ्या क्रमांकावर गेले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget